मैदुगुरी : बोको हरम या संघटनेच्या दहशतवाद्यांनी नायजेरियाच्या ईशान्येकडील कडील गावांमध्ये हल्ला करून ८६ जणांना ठार केले. याखेरीज त्यांच्या हल्ल्यात ६२ जण गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या बुधवारपासून बोको हरमने नायजेरियाच्या दक्षिण आणि ईशान्य भागांत केलेला हा तिसरा हल्ला आहे. मैदुगुरी शहरातच या संघटनेची स्थापना झाली होती.या शहराच्या बाहेरील गावांमध्ये बोको हरमच्या दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री अचानक हल्ला केला. सुमारे चार तास चाललेल्या या हल्ल्यात काही घरांवर बॉम्ब फेकण्यात आले. (वृत्तसंस्था)
बोको हरमच्या हल्ल्यात ८६ ठार
By admin | Updated: February 2, 2016 02:42 IST