गेल्या ३ महिन्यात ८ टॉप कमांडरनं दिले राजीनामे; अमेरिकन सैन्यातून बडे अधिकारी नोकरी का सोडतायेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 12:21 IST2025-10-17T12:19:11+5:302025-10-17T12:21:23+5:30
काही राजीनामे भलेही सरकारसोबतच्या वादातून दिले असतील परंतु बहुतांश लोकांवर आजही दबाव आहे.

गेल्या ३ महिन्यात ८ टॉप कमांडरनं दिले राजीनामे; अमेरिकन सैन्यातून बडे अधिकारी नोकरी का सोडतायेत?
वॉश्गिंटन - व्हेनेझुएलातील ऑपरेशन काळात आणखी एका वरिष्ठ अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. अमेरिकन माध्यमांनुसार दक्षिणी कमांडचे प्रमुख नेव्ही अॅडमिरल अल्विन होल्सी यांनी राजीनामा दिला आहे. होल्सी यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता परंतु संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्याशी असलेल्या तणावामुळे त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला.
एक्सिओसच्या मते, व्हेनेझुएलाच्या सीमेवरील जहाजांवर देखरेख करण्याची जबाबदारी होल्सी यांच्यावर होती. होल्सी यांना व्हेनेझुएलावर हल्ला करायचा नव्हता, परंतु अमेरिकन सरकार तेथे एक मोठी कारवाई सुरू करण्याची तयारी करत आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकार आल्यापासून सैन्यातील बड्या अधिकाऱ्यांचा एका पाठोपाठ एक राजीनामा देण्याचं सत्र सुरूच आहे. मागील ३ महिन्यात ८ टॉप कमांडर स्तरावरील अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. त्यात जाँईट चीफ जनरल चार्ल्स सीक्यू, एनएसए जनरल टीम हाँग, नौदल ऑपरेशन्स प्रमुख एडमिरल लिसा फ्रँचेटी, तटरक्षक दलाचे कमांडंट अॅडमिरल लिंडा फॅगन आणि संरक्षण युनिट प्रमुख डग बेक अशी प्रमुख नावे आहेत.
सरकारसोबत झालेल्या संघर्षातून या सर्व अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचं बोलले जाते. अलीकडेच अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि संरक्षण मंत्री पीटर हेगसेथ यांनी विधान केले होते. जे लढू शकत नाहीत, जे युद्धासाठी तयार नाहीत त्यांनी सैन्यातून दूर व्हावे असं थेट बजावले होते. काही राजीनामे भलेही सरकारसोबतच्या वादातून दिले असतील परंतु बहुतांश लोकांवर आजही दबाव आहे. ज्यामुळे ट्रम्प यांना जुन्या लोकांना तिथे सेट करता येईल. डोनाल्ड ट्रम्प २०१६ ते २०२० या कालावधीत अमेरिकेचे राष्ट्रपती होते.
अमेरिकन सरकारसाठी हे नुकसानदायक?
रिपोर्टनुसार पहिल्यांदाच अमेरिकन सैन्यात अनुभवाचा अभाव जाणवत आहे. ज्या टॉप कमांडरनी त्यांची पदे सोडली त्यांच्याजागी नव्या लोकांची भरती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे या माजी कमांडरकडे असलेला अनुभव नाही. कठीण काळात अनुभव महत्त्वाचा असतो, विशेषतः अमेरिकेसारख्या महासत्तेसाठी. शिवाय, नवीन भरती होणाऱ्यांमुळे लष्करावर सरकारी प्रभाव आणखी वाढेल. यामुळे भविष्यातील मॅगा मोहिमेलाही अडथळा येऊ शकतो.