फिलीपिन्समध्ये ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, सुनामीचा इशारा जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 21:01 IST2023-12-02T21:00:51+5:302023-12-02T21:01:16+5:30
शनिवारी २ डिसेंबर रोजी फिलिपाइन्समधील मिडानाओ येथे ७.४ तीव्रतेचा भूकंप झाला, त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

फिलीपिन्समध्ये ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, सुनामीचा इशारा जारी
आज फिलिपाइन्समधील मिडानाओ येथे ७.४ तीव्रतेचा भूकंप झाला असून त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, हा भूकंप रात्री ८:०७ वाजता झाला. भूकंपाचा केंद्र जमिनीत ५० किलोमीटर खोलीवर होते.
वृत्तानुसार, युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटर (EMSC) ने या भूकंपाची तीव्रता ७.५ आणि त्याचा केंद्रबिंदू ६३ किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगितले. भूकंपानंतर अमेरिकन त्सुनामी वॉर्निंग सिस्टमने सुनामीचा इशारा दिला होता.
Earthquake of Magnitude:7.4, Occurred on 02-12-2023, 20:07:08 IST, Lat: 8.56 & Long: 126.40, Depth: 50 Km ,Location: Mindanao,Philippines for more information Download the BhooKamp App https://t.co/r2BBXhuHfU@KirenRijiju@Dr_Mishra1966@Ravi_MoES@ndmaindia@Indiametdeptpic.twitter.com/SQ0p0nXAYQ
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) December 2, 2023