शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

CoronaVirus: 'त्या' अफवेमुळे इराणमध्ये हाहाकार; 728 जणांचा मृत्यू, शेकडो लोक झाले अंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 17:51 IST

इराणमध्ये कोरोनावरील उपचारासंदर्भात एक अफवा पसरली होती. या अफवेने एक-दोन नव्हे तर शेकडो लोकांचा बळी घेतला. एवढेच नाही, तर अनेकांना आपली दृष्टीही गमवावी लागली आहे.

ठळक मुद्देअल्कोहोल घेऊन कोरोनावर उपचार केला जाऊ शकतो, अशी अफवा इराणमध्ये पसरली होती5011 लोक प्यायले इंडस्ट्रिअल अल्कोहोल, अनेकजण अंधही झाले आहेतइराणमध्ये कोरोनामुळे जवळपास 5,806 जणांचा मृत्यू झाला आहे

तेहरान : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पसरलेल्या एका अफवेमुळे इराणमध्ये हजारो लोक इंडस्ट्रिअल अल्कोहोल प्यायले. यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचे आता इराण सरकारने मान्य केले आहे. इराणमध्ये, काही दिवसांपूर्वी, अल्कोहोल घेऊन कोरोनावर उपचार केला जाऊ शकतो, अशी अफवा सोशल मीडियावर पसरली होती. यानंतर येथील शेकडो मुलांसह हजारो नागरिक इंडस्ट्रिअल अल्कोहोल प्यायले. या घटनेनंतर 728 जणांचा मृत्यू झाल्याचे इराण सरकारने म्हटले आहे.

इराणमधील मृतांची गणती करणाऱ्या कार्यालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, इंडस्ट्रिअल अल्कोहोल प्यायल्याच्या घटनेनंतर केवळ 728 लोकांचा मृत्यूच झाला असे नाही, तर शेकडो लोक अंधही झाले आहेत. यात अनेक मुलांचाही समावेश आहे. अल जजीराने दिलेल्या एका वृत्तानुसार, विष प्यायल्याने मृत्यू झालेल्यांच्या यादीतच यांचाही समावेश करण्यात आला आहे. हे सर्व लोक कोरोना संक्रमणावरील उपचारासंदर्भातील औषधाच्या अफवेचे बळी ठरले आहेत.

कोरोना पसरवणारेच स्वत:ला 'कोरोना वॉरियर्स' म्हणतायेत, 'या' केंद्रीय मंत्र्याचा तबलिगींवर निशाणा

5000 लोकांनी पयले मिथेनॉल -इराणच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ता कियानौश जहांपोर यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 5011 लोक या अफवेमुळे इंडस्ट्रिअल अल्कोहोल प्यायले. एवढेच नाही, तर अनेकांनी आपल्या मुलांनाही ते पाजले. यातील अनेक जण अंध झाले आहेत. अंध होणाऱ्यांच्या संख्येत अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. या सर्वांनी एका अफवेनंतर अल्कोहोल शोधायला सुरुवात केली होती. मात्र, ते न मिळाल्याने त्यांनी मिथेनॉल घेतले.

Coronavirus : कनिका कपूर कोरोनाग्रस्तांना देऊ शकत नाही रक्त, 'हे' आहे कारण

मेथेनॉलचा वास आणि चव दारू सारखीच असते. पण, ते थेट मानवाच्या डोक्यावरच हल्ला करते. इराणमध्येही कोरोनाने थैममान घातले होते. मात्र आता येथे कोरोना नियंत्रणात आल्याचे दिसते. येथे आतापर्यंत 91,000 हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर 5,806 जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus: मुस्लिमांकडून भाज्या खरेदी करू नका; भाजपा आमदाराचं धक्कादायक विधान

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIranइराणDeathमृत्यू