700 Indian workers released from Saudi jails | सौदीमध्ये तुरुंगात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांची सुटका

सौदीमध्ये तुरुंगात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांची सुटका

मुंबई : ‘संकटात मदतीला धावतो तोच खरा मित्र’, या म्हणीचा प्रत्यय आणून देणारी कामगिरी बजावली आहे मसालाकिंग डॉ. धनंजय दातार आणि त्यांच्या दुबईस्थित ‘अल अदील ट्रेडिंग’ समूहाने. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात कोरोनानंतर लॉकडाऊनमुळे चार महिने तुरुंगात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांची सुटका, प्रवासखर्च आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था यासाठी डॉ. दातार व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली आणि भारताची प्रतिष्ठाही राखली. मुक्त झालेले हे कामगार नुकतेच मायदेशी परतले तेव्हा त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि त्यांनी डॉ. दातार हे खरोखरच ‘अल अदील’ (भला माणूस) आहेत, या शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.

काही कामगारांच्या व्हिसाची मुदत संपली होती. नोकºया गमावल्याने मिळेल ते काम करत होते. काही अक्षरश: भीक मागत होते. या गोष्टी कायद्याला धरून नसल्याने सौदी पोलिसांनी त्यांची रवानगी स्थानबद्धता केंद्रात केली होती. डॉ. दातार यांनी दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासामार्फत जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधला आणि कामगारांना भारतात नेण्याचा पूर्ण खर्च उचलण्याची तयारी दाखवली. सौदी प्रशासनाचे सहकार्य, जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासाचे प्रयत्न आणि डॉ. दातार यांनी चिकाटीने केलेला पाठपुरावा यामुळे हे कामगार नुकतेच मुक्त झाले. सौदी प्रशासनाने आणखी सहकार्य करीत या सर्व कामगारांना ‘सौदिया एअरलाइन्स’ने भारतात पाठविले. कामगारांचा जेद्दाह विमानतळापर्यंतचा प्रवास, वैद्यकीय तपासणी व भोजनाची जबाबदारी डॉ. दातार यांच्या सहकाऱ्यांनी सांभाळली. ४५१ कामगार २ विमानांनी दिल्ली विमानतळावर, तर उर्वरित २५० कामगार कोची विमानतळावर उतरले. दिल्लीत उतरलेल्या कामगारांना दिल्ली व भटिंडा येथे क्वारंटाईन करण्यात आले.5000 गरजूंना आतापर्यंत आमच्या ‘अल अदील’ समूहाच्या कंपनीने सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत हे साह्य देऊन भारतात रवाना केले आहे. मी व्यवसायाबरोबरच आखाती देशांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रसार व प्रचार यातही सक्रिय आहे. खरे तर मी विशेष काही केलेले नाही. कारण, संकटाच्या काळात आपल्या बांधवांची मदत करणे हा माणुसकीचा व भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे.
700 भारतीय कामगार सौदी अरेबियात तुरूंगात अडकून पडले असून, ते असाह्य आहेत, हे समजताच मी अस्वस्थ झालो आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा निश्चय केला. सर्वांच्या सहकार्यामुळे आता हे कामगार मुक्त झाले असून भारतात पोहोचून आपल्या कुटुंबियांसमवेत समाधानी व सुरक्षित राहतील, याचाच मला खूप आनंद आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 700 Indian workers released from Saudi jails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.