खेळताना सापडला 7 कॅरेटचा हिरा
By Admin | Updated: March 24, 2017 00:48 IST2017-03-24T00:48:39+5:302017-03-24T00:48:39+5:30
कुणाचे नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. एखादा अगदी रात्रीतूनही श्रीमंत होऊ शकतो.

खेळताना सापडला 7 कॅरेटचा हिरा
न्यू यॉर्क : कुणाचे नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. एखादा अगदी रात्रीतूनही श्रीमंत होऊ शकतो. आता हेच पाहा ना अमेरिकेतील या मुलाला खेळता खेळता एक काचेचा तुकडा सापडला. अर्थात, तो हिरा असल्याचे समजताच या कुटुंबाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. गे्रग लंगफोर्ड आणि त्यांचे कुटुंबीय एका पार्कमध्ये गेले होते. या ठिकाणी त्यांचा मुलगा कालेल हा खेळत होता. या मुलाला एके ठिकाणी पाण्याच्या तळाशी हा हिरा सापडला. भुऱ्या रंगाचा हा हिरा गत ४४ वर्षांत सापडलेला सर्वात मोठा हिरा असल्याचे सांगण्यात येत आहे. याचे वजन आहे ७.४४ कॅरेट. कालेलचे वडील ग्रेग यांनी सांगितले की, सुरुवातीला आम्हालाही हे कळले नाही की, हा हिरा आहे. आतापर्यंत या पार्कमध्ये सात हिरे सापडलेले आहेत.