शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

तुरुंगातून पळण्यासाठी कैद्यांनी लावलेल्या आगीत 68 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 16:37 IST

तुरुंगातून पळण्यासाठी कैद्यांनी लावलेल्या आगीत होरपळून सुमारे 68 जणांचा मृत्यू झाल्याची घटना

काराकस - तुरुंगातून पळण्यासाठी कैद्यांनी लावलेल्या आगीत होरपळून सुमारे 68 जणांचा मृत्यू झाल्याची घटना व्हेनेझुएलामध्ये घडली आहे. व्हेनेझुएलामधील एका तुरुंगातील कैद्यांनी कैदेतून पळ काढण्यासाठी बराकींमधील गाद्यांना आग लावली होती. मात्र या आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केल्याने त्यात अनेकजण होरपळले. कैद्यांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या संघटनेने ही माहिती दिली आहे. व्हेनेझुएलामधील तुरुंग हे अतिरिक्त कैद्यांनी भरलेले आहेत. काराबोबोमधील तुरुंगात लागलेली ही आग येथील तुरुंगात होणाऱ्या दुर्घटनांपैकी एक आहे. यासंदर्भात मुख्य अभियोक्ता तारेक विल्यम साब यांनी ट्विटरवर सांगितले की, "काराबोबो येथील पोलिस मुख्यालयामध्ये झालेल्या भयावह दुर्घटना विचारात घेऊन आम्ही त्यांच्या तपासासाठी चार अभियोक्त्यांची नियुक्ती केली आहे. काकाबोबो येथील कारागृहात लागलेल्या आगीत 68 जणांचा मृत्यू झाला आहे." उना वेनताना अ ला लिबरटाड नावाच्या संघटनेचे अध्यक्ष कार्लोस निएटो यांनी सांगितले की काही जणांचा मृत्यू हा होरपळून झाला तर काही जण गुदमरल्यामुळे मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. त्या महिला तुरुंगात बंद असलेल्या आपल्या नातेवाईकांस भेटण्यासाठी आल्या असाव्यात. तुरुंगातून पळण्यासाठी कैद्यांनी गाद्यांना आग लावली होती. तसेच सुरक्षा रक्षकांच्या बंदुका चोरल्या होत्या. या दुर्घटनेनंतर संतापलेल्या कैद्यांच्या नातेवाईकांनी तुरुंगाबाहेर पोलिसांना मारहाण केली. शेवटी पोलिसांनी त्यांना पळवून लावण्यासाठई अश्रुधुराचे गोळे डागले.  

टॅग्स :PrisonतुरुंगjailतुरुंगDeathमृत्यू