सैनिकांकडून 653 गोळ्या गायब, हुकूमशहाने केले संपूर्ण शहर लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 11:25 AM2023-03-28T11:25:30+5:302023-03-28T11:25:54+5:30

पोलिस आणि लष्कराकडून घरोघरी झडती सुरू आहे.

653 bullets disappeared from north korean soldier kim jong un imposed lockdown in the entire city | सैनिकांकडून 653 गोळ्या गायब, हुकूमशहाने केले संपूर्ण शहर लॉकडाऊन

सैनिकांकडून 653 गोळ्या गायब, हुकूमशहाने केले संपूर्ण शहर लॉकडाऊन

googlenewsNext

उत्तर कोरियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील हुकूमशहा किम जोंग उन यांनी एका शहरात लॉकडाऊन केले आहे. कारण या शहरातील सैनिकांकडून 653 बंदुकीच्या गोळ्या गायब झाल्या आहेत. आता त्या शोधण्यासाठी संपूर्ण शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

रेडिओ फ्री एशियाने दिलेल्या वृत्तानुसार, 7 मार्च रोजी सैन्य माघारीदरम्यान 653 गोळ्या गायब झाल्या. जोपर्यंत सर्व गोळ्या सापडत नाहीत, तोपर्यंत शहरात लॉकडाऊन राहील, असा सरकारचा कडक आदेश देण्यात आला आहे. पोलीस आणि लष्कर दोघेही मिळून या बंदुकीच्या गोळ्यांचा शोध घेत आहेत, मात्र 10 दिवस उलटून गेले तरी अद्याप या गोळ्या सापडलेल्या नाहीत.

दरम्यान, ही घटना रियांगगँगच्या उत्तर भागातील हेसन शहरात घडली. शहरात लॉकडाऊन लागू झाल्यामुळे दोन लाख लोकसंख्या घरात कैद झाली आहे. बंदुकीच्या गोळ्या गायब झाल्यापासून सैनिकांकडून शोध मोहीम सुरू आहे. लष्कराचे अधिकारी घरोघरी शोधमोहीम राबवत आहेत, असेही रेडिओ फ्री एशियाने म्हटले आहे. 

रिपोर्टनुसार, 7 मार्च रोजी कोरियन पीपल्स आर्मी 7वी बटालियन या भागातून परतली. कोरोना साथीच्या आजाराच्या सुरूवातीला चिनी सीमा बंद करण्यासाठी 2020 मध्येच 7 वी बटालियन तैनात करण्यात आली होती. कोरोनाचे संकट संपल्यानंतर लष्कराला माघारी बोलावण्यात आले. यादरम्यान  653 गोळ्या गायब झाल्या. 

सुरुवातीला स्वत: जवान गोळ्यांचा शोध घेण्यात व्यस्त होते, मात्र, त्यांना सापडल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. यानंतर लॉकडाऊन लागू करून संपूर्ण शहर सील करण्यात आले. वृत्तानुसार, संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे. पोलिस आणि लष्कराकडून घरोघरी झडती सुरू आहे. मात्र तपास सुरू होऊन दहा दिवस उलटून गेले तरी कोणताही सुगावा लागलेला नाही.

Web Title: 653 bullets disappeared from north korean soldier kim jong un imposed lockdown in the entire city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.