१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 09:51 IST2025-06-29T09:49:27+5:302025-06-29T09:51:09+5:30

जागतिक अस्थिरता आणि संघटित गुन्हेगारीमुळे ड्रग्ज व्यसनाची समस्या धोकादायक वळणावर आणली आहे. १५ ते ६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या आता कोणत्या ना कोणत्या ड्रग्जच्या विळख्यात आहे.

6% of the world's population aged 15-64 is addicted to drugs, cocaine is 'the fashion of the rich' | १५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’

१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’

व्हिएन्ना : जागतिक अस्थिरता आणि संघटित गुन्हेगारीमुळे ड्रग्ज व्यसनाची समस्या धोकादायक वळणावर आणली आहे. १५ ते ६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या आता कोणत्या ना कोणत्या ड्रग्जच्या विळख्यात आहे. व्हिएन्ना येथील युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज ॲण्ड क्राइम (यूएनओडीसी)च्या  ताज्या अहवालानुसार, २०२३ मध्ये कोकेनचे बेकायदा उत्पादन, तस्करी आणि सेवनाने सर्व विक्रम मोडले आहेत. सध्या कोकेनचा बेकायदा व्यापार जगातील सर्वांत वेगाने वाढत आहे. कोलंबिया अजूनही कोकेनचा सर्वांत मोठा उत्पादक देश आहे; परंतु आशिया आणि आफ्रिकेत तस्करीच्या नवनवीन प्रकारांनी ही समस्या जागतिक होत चालली आहे. पश्चिम बाल्कन प्रदेशातील गुन्हेगारी टोळ्या या व्यवसायात अधिकाधिक सक्रिय झाल्या आहेत.

कोकेनची चिंताजनक आकडेवारी

उत्पादन : ३,७०८ टन बेकायदा उत्पादन, २०२२ पेक्षा ३४ % जास्त आणि २०१३ पेक्षा चार पट जास्त

वापरकर्ते : १० वर्षांपूर्वी १.७ कोटींपेक्षा आता

२.५ कोटी ग्राहक

जप्त : २,२७५ टन

कोकेन जप्त, २०२३ पर्यंत

४ वर्षांत ६८% वाढ

श्रीमंत वर्गाचे ‘स्टेटस ड्रग्ज’

युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज ॲण्ड क्राइम (यूएनओडीसी)च्या मुख्य संशोधक अँजेला मी यांच्या मते, कोकेन आता श्रीमंत वर्गाचे ‘स्टेटस ड्रग’ बनले आहे.

अरब देशांमध्येही कॅप्टागोनची तस्करी सुरू आहे. ॲम्फेटामाइन आणि फेंटेनिलसारख्या सिंथेटिक ड्रग्ज जप्त करण्याचे प्रमाणदेखील विक्रमी पातळीवर पोहोचले आहे, जे एकूण जप्तीच्या निम्मे आहे.

मोठ्या प्रमाणात विक्री होणारे ड्रग्ज

कोकेन, हेरॉइन, भांग, एक्स्टसी (एमडीएमए), एलएसडी (एलएसडी), मेथेम्फेटामाइन यांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. याव्यतिरिक्त, अनेक सायकोट्रॉपिक औषधे देखील अमली पदार्थांमध्ये येतात.

Web Title: 6% of the world's population aged 15-64 is addicted to drugs, cocaine is 'the fashion of the rich'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.