शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 15:34 IST

Afghanistan Pakistan Clashes: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून चकमक सुरू असून, तालिबानने पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केले. काबुलमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सीमेवरील संघर्षाचा भडका उडाला.

Afghanistan Pakistan Latest News: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढला आहे. शुक्रवारी (१० ऑक्टोबर) पाकिस्तानने हवाई हद्दीचा भंग करत काबुलसह अफगाणिस्तानातील दोन ठिकाणी हल्ला केल्याचा दावा तालिबान सरकारने केला होता. त्यानंतर शनिवारी रात्री दोन्ही देशातील संघर्ष पेटला. अफगाणिस्तानने पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांना निशाणा बनवले, यात ५८ पाकिस्तानी सैनिक मारले गेले. तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने हा दावा केला आहे. सीमेवरील पाकिस्तानच्या २० चौक्या तालिबानने ताब्यात घेतल्या होत्या. त्या परत देण्यात आल्या आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी रविवारी (१२ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती दिली. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला तालिबानने जोरदार प्रत्युत्तर दिले. यात पाकिस्तानचे ५८ सैनिक मारले गेले, तर ३० जखमी झाले आहेत, असा दावा त्यांनी केला. 

पाकिस्तानच्या २० चौक्या तालिबानने घेतल्या होत्या ताब्यात

काबुलमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत बोलताना जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाले, "सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार केला गेला. प्रत्युत्तरात तालिबानने गोळीबार केला. या चकमकीवेळी पाकिस्तानच्या २० चौक्यांवर अफगाणिस्तानने कब्जा केला होता. पण, संघर्ष कमी झाल्यानंतर त्या परत पाकिस्तानला दिल्या गेल्या आहेत."

इसिसचा म्होरक्या पाकिस्तानात 

जबीहुल्लाद मुजाहिद म्हणाले की, "आयएसआयएसचा म्होरक्या पाकिस्तानात आहे. ही दहशतवादी संघटना सध्या खैबर पख्तूनख्वाह आणि बलुचिस्तानमध्ये सक्रीय आहे. अफगाणिस्तानातून आयएसआयएसचा सुफडा साफ झाला आहे. आयएसआयएसचे प्रशिक्षण अड्डे सध्या पाकिस्तानात आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने त्याकडे लक्ष दिले पाहिजे."

अफगाणिस्तानने ५८ पाकिस्तानी सैनिक मारले असल्याचा दावा केला आहे. यावर अद्याप पाकिस्तानकडून कोणतेही उत्तर दिले गेलेले नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Afghanistan claims 58 Pakistani soldiers killed; ISIS leader in Pakistan?

Web Summary : Taliban claims 58 Pakistani soldiers died in clashes after Pakistan's alleged airstrikes. Taliban briefly seized 20 Pakistani outposts. ISIS leader is reportedly in Pakistan, active in Khyber Pakhtunkhwa and Balochistan, says Taliban.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तानTalibanतालिबान