55 countries supports India for membership of Security Council | सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वासाठी भारताला ५५ देशांचा पाठिंबा
सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वासाठी भारताला ५५ देशांचा पाठिंबा

संयुक्त राष्ट्रे  - आशिया-प्रशांत समूहाने संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) दोन वर्षांच्या हंगामी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. भारतासाठी हा राजनैतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण विजय असून, यावरून जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावल्याचे प्रतीत होते.
पंधरा देश सदस्य असलेल्या या परिषदेच्या पाच हंगामी सदस्यांसाठी २०२१-२२ या दोन वर्षांच्या मुदतीसाठी पुढील वर्षात जूनच्या आसपास निवडणूक होणार आहे.
यूएनएससीने या परिषदेच्या दोन वर्षांच्या हंगामी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला सर्वानुमते मंजुरी दिली. सर्व ५५ सदस्यांनी एकमुखी पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी टष्ट्वीट केले आहे.
भारताच्या उमेदवारीला पाठिंबा देणाऱ्या ५५ देशांत अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, चीन, इंडोनेशिया, इराण, जपान, कुवैत, किर्गिझिस्तान, मलेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, कतार, सौदी अरब, श्रीलंका, सिरिया, तुर्की, संयुक्त अरब अमिरात आणि व्हिएतनामचा समावेश आहे. दरवर्षी १९३ सदस्यीय संयुक्त राष्ट्रांची आमसभा दोन वर्षांसाठी संयुक्त राष्टÑ सुरक्षा परिषदेच्या पाच हंगामी सदस्यांची निवड करते. चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका हे पाच देश संयुक्त राष्टÑ सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य आहेत. विभागीय आधारावर या परिषदेच्या दहा हंगामी जागांचे वाटप करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

 


Web Title: 55 countries supports India for membership of Security Council
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.