ब्रिटनला जाणाऱ्या ५० लाख लसी भारतातच वापणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 06:39 AM2021-05-08T06:39:26+5:302021-05-08T06:39:51+5:30

‘सीरम’च्या विनंतीनंतर केंद्र सरकारचा निर्णय

5 million vaccines going to Britain will be used in India alone | ब्रिटनला जाणाऱ्या ५० लाख लसी भारतातच वापणार

ब्रिटनला जाणाऱ्या ५० लाख लसी भारतातच वापणार

Next

नवी दिल्ली : देशात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणासाठी लसींचा तुटवडा लक्षात घेऊन केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनला निर्यात होणारे ‘कोविशील्ड’ लसीचे ५०  लाख डोस भारतातच वापरण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

देशात सुरु असलेले लसीकरण आणि त्यांची उपलब्धता यांचा विचार करता ब्रिटनला निर्यात होणाऱ्या या साठ्याच्या वापर भारतातच करावा, अशी विनंती "सीरम"चे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून केली होती. केंद्राने तीन मान्य केली आहे. त्यामुळे सरकारकडे ५० लाख डोसेसचा साठा उपलब्ध झाला आहे. हा साठा २१ राज्ये व केंद्र शासित प्रदेशांमध्ये १८ ते ४४ या वयोगटाच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

सरकारने १ मेपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली होती. मात्र, लसींचा तुटवडा असल्यामुळे अनेक राज्यांनी तिसरा टप्पा 
लांबणीवर टाकला. तसेच ज्या राज्यांनी सुरू केला, तेथे संथ गतीने लसीकरण होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढत असताना व्यापक लसीकरणाची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली होती.

Web Title: 5 million vaccines going to Britain will be used in India alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.