शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

अमेरिकेत 'इडा' चक्रीवादळाचा कहर, न्यूयॉर्कमध्ये ४४ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 10:25 IST

Hurricane Ida : या चक्रीवादळामुळे विक्रमी पाऊस पडला, ज्यामुळे न्यूयॉर्क शहरात अचानक अभूतपूर्व पूर आला.

न्यूयॉर्क : अमेरिकेत इडा चक्रीवादळाने कहर केला आहे. येथील न्यूयॉर्क परिसरात इडा (Hurricane Ida) चक्रीवादळामुळे आलेल्या पुरात गुरुवारी जवळपास ४४ जणांचा मृत्यू झाला. यापैकी अनेक लोक चक्रीवादळामुळे आपल्या तळघरांमध्ये होते, त्यावेळी आलेल्या पुरात त्यांच्या मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.  (44 Dead After Hurricane Ida Causes Flash Flooding in New York, Turns Streets into Rivers)

या चक्रीवादळामुळे विक्रमी पाऊस पडला, ज्यामुळे न्यूयॉर्क शहरात अचानक अभूतपूर्व पूर आला. येथील रस्ते अचानक नद्यांमध्ये बदलले आणि सर्वत्र पाणी भरल्याने भुयारी मार्गसेवा बंद करण्यात आली. वादळाचे भयावह दृश्य लक्षात घेता प्रशासनाला आपत्कालीन घोषणा करावी लागली आहे.

मॅनहॅटनच्या रेस्टॉरंटच्या तळघरात तीन इंच पाणी भरलेले होते, असे मेटोडिजा मिहाज्लोव्ह यांनी वृत्तसंस्था एएफपीला सांगितले. "मी ५० वर्षांचा आहे आणि मी इतका पाऊस कधीच पाहिला नाही. हे उष्णकटिबंधीय पावसासारखे जंगलात राहण्यासारखे होते. अविश्वसनीय. या वर्षी सर्व काही खूप विचित्र होत आहे", असे मेटोडिजा मिहाज्लोव्ह यांनी सांगितले. 

ईशान्यकडील अमेरिकेवर इडा चक्रीवादळाचा वाईट परिणाम झाला आहे. चक्रीवादळामुळे उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. लागार्डिया आणि जेएफके विमानतळ तसेच नेवार्क विमानतळावरून शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एका व्हिडिओमध्ये विमानतळाच्या टर्मिनलनल पावसाच्या पाण्याने भरलेले दिसत आहे.

यापूर्वी अमेरिकेला जबरदस्त तडाखा देणारे चक्रीवादळ  कतरिना होते. २००५ मध्ये आलेल्या या चक्रीवादळामुळे १८०० जणांचा जीव गेला होता. त्यानंतर अमेरिकेमध्ये पूर परिस्थिती उद्भवल्यास तिला तोंड देण्यासाठीच्या अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. 

ही वादळे केव्हा येतात?अटलांटिक महासागरात ही वादळे सामान्यतः १ जून ते ३० नोव्हेंबरदरम्यान येतात. या प्रदेशातील ९५ टक्क्यांपेक्षा अधिक वादळे याच कालावधीत येतात. वायव्य पॅसिफिक महासागरातील टायफून मे ते ऑक्टोबरदरम्यान येतात. असे असले तरी ही वादळे वर्षात कधीही तयार होऊ शकतात. तर दक्षिण पॅसिफिक महासागरात सायक्लोन नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान येते.

चक्रीवादळाचे नामकरणसमुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले की हवामान खात्याकडून त्याचे नामकरण केले जाते. वादळांची ही चमत्कारिक नावे देण्याचा प्रघात तसा जुनाच म्हणजे, गेल्या शतकभरातला आहे. पाश्चिमात्य देशांकडून वादळांना नावे देण्याची सुरुवात झाली. ताशी ६५ किमीपेक्षा अधिक वेगाच्या चक्रीवादळाचे नामकरण होते. अमेरिकेकडून चक्रीवादळांना महिलांची नावे दिली जातात. प्रादेशिक वैशिष्ट्यांची नावे देण्याचाही विचार असतो. नावे देताना कुणाच्या भावना न दुखवण्याची सूचना दिली जाते. महासागरानुसार काही झोन तयार करण्यात आले आहेत. त्या-त्या झोनमधील देशांनी नावे सुचवायची आणि जसजशी चक्रीवादळे येतील. तशी अनुक्रमे येणाऱ्या वादळांना नावे द्यायची हा नियम आहे. भारत नॉर्थ इंडियन ओशनिक झोनमध्ये येतो.

कशी ठेवली जातात चक्रीवादळांना नावे?अटलांटिक क्षेत्रातील चक्रीवादळांची नावे १९५३पासून ठरण्यास सुरुवात झाली आहे. हिंद महासागर क्षेत्रातील आठ देशांनी भारताच्या मागणीनुसार या चक्रीवादळांचे २००४ पासून नामकरण करण्याची व्यवस्था करून दिली. या आठ देशांमध्ये बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, थायलंड आणि श्रीलंकेचा समावेश आहे. प्रत्येक देशाने वादळासाठी प्रत्येकी ८, अशी ६४ नावे ठरवून दिली आहेत. भारताने अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू ही आठ नावे सुचवलेली होती. आतापर्यंत चक्रीवादळांची ६४ नावे ठेवण्यात आली आहेत. भारताने एका चक्रीवादळाला 'लहर' हे नाव दिले होते. 

टॅग्स :Americaअमेरिकाcycloneचक्रीवादळ