काबूलमध्ये स्फोटांमध्ये ४० ठार, अनेक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 04:16 IST2017-12-29T04:15:49+5:302017-12-29T04:16:09+5:30
काबूल : शिया मुस्लिमांच्या येथील सांस्कृतिक (तबायन) केंद्रात गुरुवारी घडवण्यात आलेल्या आत्मघाती स्फोटांत किमान ४० जण ठार तर किमान १८ जण जखमी झाले.

काबूलमध्ये स्फोटांमध्ये ४० ठार, अनेक जखमी
काबूल : शिया मुस्लिमांच्या येथील सांस्कृतिक (तबायन) केंद्रात गुरुवारी घडवण्यात आलेल्या आत्मघाती स्फोटांत किमान ४० जण ठार तर किमान १८ जण जखमी झाले. हा हल्ला आपण घडवल्याचा दावा इस्लामिक स्टेटने केला आहे. अफगाणिस्तानात रशियाने केलेल्या आक्रमणाच्या ३८ व्या वर्षानिमित्त तेथे कार्यक्रम सुरू असताना हे स्फोट झाले, असे अंतर्गत मंत्रालयाचे उपप्रवक्ते नसरत राहिमी यांनी सांगितले.