शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

315 वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजातून खजिना काढणार! किंमत तब्बल १७ अब्ज डॉलर्स; कोलंबिया होणार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 12:22 IST

काही वर्षांपूर्वी कोलंबियाच्या नौदलाने एका जहाजात रोबोटच्या मदतीने मोठा खजिना शोधून काढला होता.

बोगोटा : कोलंबिया सरकार ३१५ वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या स्पॅनिश नौदलाच्या जहाजाचे अवशेष बाहेर काढण्याच्या तयारीत आहे. काही वर्षांपूर्वी कोलंबियाच्या नौदलाने एका जहाजात रोबोटच्या मदतीने मोठा खजिना शोधून काढला होता.

यामध्ये सोने, चांदी आणि मौल्यवान रत्नांचा समावेश आहे. त्यांची किंमत तब्बल १७ अब्ज डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. कोलंबियातील कार्टाजेनाच्या किनाऱ्याजवळ याचे अवशेष सापडले होते. कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी प्रशासनाला गॅलन सॅन जोस नावाच्या जहाजासह पाण्यातून बुडालेला खजिना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत.

कोलंबियाचे सांस्कृतिक मंत्री जुआन डेव्हिड कोरिया म्हणाले की, अध्यक्ष पेट्रो यांना २०२६ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी जहाज  जमिनीवर आणायचे आहे. कोलंबियाने २०१७ मध्ये ३,१०० फूट खोल समुद्रात रिमाेटने चालणारे यंत्र पाठविले होते. यंत्राने जहाजाच्या घेतलेल्या फोटोंमध्ये विखुरलेले सोन्याचे तुकडे, तोफ आणि चिनी मातीचे कप दिसले. तोफ, तलवारी आणि भांडी चमकताना दिसत होती.

आणखी दोन देशांचा खजिन्यावर दावाआणखी दोन देशांनी या खजिन्यावर दावा केला आहे. हा खजिना कोणाचा यावरून स्पेन, बोलिव्हिया आणि कोलंबिया यांच्यात वाद आहे. स्पेनचा दावा आहे की हा त्यांचा खजिना आहे, कारण जहाज त्यांचे आहे. बोलिव्हिया म्हणते की ते त्यांच्या मालकीचे आहे, कारण त्यांना स्पेनने धातूंचे खणण करण्यास भाग पाडले होते.

लुटण्याचा प्रयत्न, ६०० सैनिकांचा मृत्यू- १७०८ मध्ये ब्रिटिश सैन्याने स्पेनवर हल्ला केला. त्यावेळी स्पॅनिश राज्यांतून गोळा केलेला खजिना जहाजांतून नेला जात होता.- सॅन जोस हे जहाजही त्याच्यात होते. त्यावर एक कोटीहून अधिक सोन्याची नाणी, मौल्यवान रत्ने होती. - ब्रिटिश जहाजांनी कॅरिबियन समुद्रात ते घेरण्याचा आणि लुटण्याचा प्रयत्न केला होता, यात ते बुडाले होते. - बुडाल्यामुळे जहाजावरील ६०० सैनिक, क्रू मेंबर्स यात मारले गेले.

टॅग्स :ColombiaकोलंबियाInternationalआंतरराष्ट्रीय