शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जगात ३ महिन्यांत ओमायक्रॉनचे ३ अब्ज नवे रुग्ण?; ब्रिटनमधील पाहणीचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 10:17 AM

ब्रिटनमधील पाहणीचा निष्कर्ष; अमेरिका, आशिया खंडात रुग्ण वाढणार

लंडन : ओमायक्रॉन संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असूून, जगभरात येत्या तीन महिन्यांत या विषाणूमुळे आणखी तीन अब्ज लोक बाधित होतील, असा ब्रिटनमधील एका वै्द्यकीय पाहणीचा निष्कर्ष आहे. युरोप तसेच उत्तर अमेरिकेत तसेच आशिया खंडात या विषाणूचे रुग्णांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.

आफ्रिका खंडामध्ये ओमायक्रॉनच्या बाधितांची संख्या नुकतीच वेगाने वाढली होती. २०२२ च्या मध्यापर्यंत प्रत्येक देशातील ७० टक्के जनतेला लस मिळणे आवश्यक आहे. तरच कोरोनाची साथ आटोक्यात येऊ शकेल, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. आफ्रिका खंडामध्ये ८५ टक्के लोकांना अद्याप लसच मिळालेली नाही. ओमायक्रॉन हा कोरोनाच्या इतर विषाणूंपेक्षा कमी घातक असला, तरी कोरोना लस प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.

लसींच्या वाटपाबद्दल असलेली विषमता कोरोना संसर्ग वाढण्यास पूरक ठरते आहे. त्यावर जगातील सर्व देशांनी तातडीने तोडगा काढला पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते.  लस घेतलेल्यांच्या तुलनेत एकही लस न घेतलेल्या लोकांना कोरोना संसर्गानंतर रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते. प्रसंगी त्यांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने प्राधान्याने लस घ्यावी, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. 

जगभरात ३२ कोटी १२ लाख रुग्णजगभरात कोरोनाचे ३२ कोटी १२ लाख रुग्ण असून, त्यातील २६ कोटी ४३ लाख लोक बरे झाले. ५५ लाख ४१ हजार जणांचा मृत्यू झाला; तर ५ कोटी १३ लाख सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ९६ हजार लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. जगात अमेरिकेत सर्वाधिक ६ कोटी ५२ लाख रुग्ण असून, तिथे ८ लाख ६९ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त रुग्णसंख्येबाबत अमेरिकेनंतर भारत व ब्राझीलचा क्रमांक लागतो. 

आफ्रिकेतील चौथी लाट ओसरली

  • आफ्रिकेत कोरोनाची आलेली चौथी लाट सहा आठवड्यांनंतर ओसरली आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. 
  • ओमायक्रॉन हा नवा विषाणू आफ्रिका खंडातच पहिल्यांदा आढळून आला व नंतर जगभर पसरला. 
  • दक्षिण आफ्रिकेत या विषाणूमुळे काही आठवड्यांपूर्वी आलेल्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली होती; मात्र डेल्टा विषाणूने जितके नुकसान केले तितके नव्या विषाणूने केलेले नाही. 
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका