शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कोवळ्या वयातच तिने करुन घेतली नसबंदी, भविष्यात मुल नकोच...कारण समजल्यावर हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 18:05 IST

एका तरुणीने मात्र लग्न आणि मूल होण्याआधीच नसबंदी करून घेतली आहे. त्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत.

सामान्यपणे मुलं झालं की काही कपल नसबंदी करून घेतात. नसबंदी म्हणजे कायमचा गर्भनिरोधक पर्याय (methods of contraception). एक-दोन मुलं झाली की त्यानंतर आणखी मूल नको म्हणून हा मार्ग स्वीकारला जातो (Female sterilization). पण एका तरुणीने मात्र लग्न आणि मूल होण्याआधीच नसबंदी करून घेतली आहे. त्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत (Woman sterilized before marriage and kids).

अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles, America) राहणारी २४ वर्षांची एबी रामसे (Abby Ramsay). ना तिचं लग्न झालं आहे, ना तिला मुलं आहेत. पण तरी त्याआधीच तिने नसबंदी करण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय जितका धक्कादायक आहे, त्यामागील कारण त्यापेक्षाही धक्कादायक आहे.

डेली स्टारशी बोलताना एबीने सांगितलं, ती अशा शाळेत शिकली, अशा कुटुंबात वाढली जिथं नेहमी कुटुंब आणि ते वाढवण्याचं महत्त्व सांगण्यात आलं. पण रिलेशिपनमध्ये असताना जेव्हा ती गर्भनिरोधक औषधं घ्यायची किंवा इतर गर्भनिरोधक पर्यायांचा अवलंब करायची तेव्हा तिला शारीरिकरित्या त्रास व्हायचा. एकदा तर ती गर्भनिरोधक पर्याय फेल झाल्याने प्रेग्नंटही झाली. तेव्हा ती खूप घाबरली. तिच्या मनात प्रेग्नन्सीची भीती निर्माण झाली. आपल्याला स्वतःला कधीच प्रेग्नंट अवस्थेत पाहायचं नाही, त्यामुळे नसबंदी करून घेतली.

एबी म्हणाली, "मेनोपॉजपर्यंत महिलांना आपल्या प्रेग्नन्सीबाबत विचार करावा लागतो, या चिंतेने त्यांना शांतपणे आयुष्य जगता येत नाही. लोकांना वाटतं की गर्भनिरोधसाठी थेट सर्जरीचा पर्याय योग्य नाही. पण जेव्हापासून मी सर्जरी केली तेव्हापासून मला प्रेग्नन्सीची बिलकुल चिंता नाही आणि यामुळे मी खूप खूश आहे. सर्जरी करण्यांचं आपण योग्य पाऊल उचललं." एबी कर्ट नावाच्या एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यालासुद्धा तिच्या नसबंदीमुळे काहीच फरक पडत नाही, असंही तिने सांगितलं.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेAmericaअमेरिकाmarriageलग्न