85 वर्षीय वृद्धाच्या प्रेमात वेडी झाली 24 वर्षांची तरुणी; म्हणते, "मला व्हायचंय त्याच्या बाळाची आई"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 17:00 IST2023-02-14T16:58:02+5:302023-02-14T17:00:55+5:30
24 वर्षीय मिरेकलने आपल्यापेक्षा 61 वर्षांनी मोठ्या असलेल्या 85 वर्षीय चार्ल्स पोग यांची जीवनसाथी म्हणून निवड केली.

85 वर्षीय वृद्धाच्या प्रेमात वेडी झाली 24 वर्षांची तरुणी; म्हणते, "मला व्हायचंय त्याच्या बाळाची आई"
'प्रेम आंधळं असतं' असं म्हणतात. प्रेमाचे भन्नाट किस्से हे आपण नेहमीच ऐकत असतो. अशीच एक अजब प्रेमाची गजब कहाणी पाहायला मिळत आहे. एक 24 वर्षांची तरुणी चक्क 85 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात पडली. दोघेही गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात बुडाले आहेत. एवढच नाही तर तरुणीला वृद्धाच्या बाळाची आता आई व्हायचं आहे. लोक काय म्हणतील याचा विचार न करता हे दोघे एकत्र राहतात.
अमेरिकेतील मिसिसिपी येथे राहणाऱ्या 24 वर्षीय मिरेकलने आपल्यापेक्षा 61 वर्षांनी मोठ्या असलेल्या 85 वर्षीय चार्ल्स पोग यांची जीवनसाथी म्हणून निवड केली. आता दोघेही फॅमिली प्लॅनिंग करत आहेत. मिरेकलचे म्हणणे आहे की, तिला IVF च्या माध्यमातून आता मुलाला जन्म द्यायचा आहे. निवृत्त रिअल इस्टेट एजंट चार्ल्ससोबत 2019 मध्ये मिरेकलची भेट झाली होती. मग मिरेकलला चार्ल्ससोबतच्या तिच्या नात्याबद्दल लोकांकडून खूप टोमणे ऐकावे लागले.
चार्ल्स घरात एकटेच राहत होते. त्यामुळे त्यांची काळजी घेणारे कोणी नव्हते. चार्ल्सने मिरेकलला परिचारिका म्हणून नियुक्त केले. या काळात त्यांना मनातून मिरेकल कधी आवडू लागली, हे कळलेच नाही. जवळजवळ एक वर्षानंतर, फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांनी आपल्या भावना मिरेकलशी शेअर केल्या.
मिरेकलच्या मते, तिची 45 वर्षीय आई तामिका फिलिप्स आणि 72 वर्षीय आजोबा जो ब्राउन यांना चार्ल्ससोबतच्या तिच्या नात्यात कोणतीही अडचण नव्हती, कारण चार्ल्सने त्यांची खूप काळजी घेतली होती. मात्र 47 वर्षीय वडील करीम फिलिप्स यांचा यावर तीव्र आक्षेप होता. आजही तिच्या वडिलांनी हे नाते मनापासून स्वीकारलेले नाही. मिरेकल आणि चार्ल्सचे गेल्या वर्षी जुलैमध्ये लग्न झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"