शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात आढळले 2300 वर्षे जुने बौद्ध विहार, अडीच हजारांहून अधिक कलाकृतीही सापडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 16:06 IST

या मंदिरासोबतच नाणी, अंगठ्या, भांडी आणि ग्रीसचा राजा मिनंदर याच्या काळातील खरोष्ठी भाषेत लिहिलेल्या साहित्यासह 2700 हून अधिक बौद्ध कलाकृती देखील सापडल्या आहेत.

कराची:पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात पाकिस्तानी आणि इटालियन पुरातत्वशास्त्रज्ञांच्या पथकाला 2,300 वर्षे जुने बौद्ध विहार/मंदिर (Buddha Temple Pakistan) सापडले आहे. या विहारासोबतच इतर काही मौल्यवान कलाकृतीही सापडल्या आहेत. हे विहार खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यातील बाजीरा शहरात सापडले आहे. या बिहाराचे वर्णन पाकिस्तानातील बौद्ध काळातील सर्वात जुने विहार म्हणून केले जात आहे.

या संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'पाकिस्तान आणि इटालियन पुरातत्वशास्त्रज्ञांनी वायव्य पाकिस्तानमधील एका ऐतिहासिक ठिकाणी संयुक्त उत्खननादरम्यान 2,300 वर्षे जुने बौद्ध काळातील विहार शोधून काढले आहे. याशिवाय इतर मौल्यवान कलाकृतीही सापडल्या आहेत. स्वातमध्ये सापडलेले हे विहार पाकिस्तानातील तक्षशिला येथील मंदिर आणि विहारांपेक्षाही जुने आहे.

2700 हून अधिक कलाकृती सापडल्याया विहाराव्यतिरिक्त, नाणी, अंगठ्या, भांडी आणि ग्रीसचा राजा मिनंदर याच्या काळातील खरोष्ठी भाषेत लिहिलेल्या साहित्यासह 2700 हून अधिक बौद्ध कलाकृती देखील सापडल्या आहेत. स्वात जिल्ह्यातील बाजीरा या ऐतिहासिक शहरात  उत्खननादरम्यान आणखी पुरातत्व स्थळे सापडतील, असा विश्वास इटालियन तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पाकिस्तानमधील पुरातत्व स्थळे जगातील विविध धर्मांसाठी खूप महत्त्वाची आहेत, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानमधील इटालियन राजदूत आंद्रे फेरारिस यांनी दिली.

याआधीही शोध झाले आहेत

2020 च्या सुरुवातीला पाकिस्तानमधील पुरातत्वशास्त्रज्ञांना उत्खननात विष्णू मंदिर परिसराचे अवशेष सापडले होते. हा शोध स्वात परिसरातच लागला होता. या अवशेषांवरुन असे दिसून आले की येथे किमान 1000 वर्षे जुने हिंदू मंदिर होते. हे मंदिर पाकिस्तान आणि इटलीच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी शोधले होते. बरीकोट घुंडईच्या डोंगरांमध्ये उत्खननाच्या वेळी हे मंदिर सापडले होते. त्यावेळी खैबर पख्तुनख्वाच्या पुरातत्व विभागाचे फजले खालिक यांनी हे मंदिर भगवान विष्णूचे असल्याचे सांगितले होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBuddha Cavesबौद्ध लेणी