2025पर्यंत युरोपमध्ये सर्वाधिक लठ्ठ ब्रिटनमध्ये
By Admin | Updated: April 1, 2016 13:04 IST2016-04-01T13:00:09+5:302016-04-01T13:04:24+5:30
युरोपमध्ये 2025पर्यंत ब्रिटिश लोकांची सर्वाधिक लठ्ठ म्हणून गणना होण्याची शक्यता आहे.

2025पर्यंत युरोपमध्ये सर्वाधिक लठ्ठ ब्रिटनमध्ये
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 1- युरोपमध्ये 2025पर्यंत ब्रिटिश लोकांची सर्वाधिक लठ्ठ म्हणून गणना होण्याची शक्यता आहे. एका सर्वेक्षणाअंती 10 लोकांमधली जवळपास 4 लोकांचं वजन प्रमाणाच्या बाहेर आहे. त्यामुळे 2025पर्यंत ब्रिटन हे अतिलठ्ठ लोकांचं शहर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. ब्रिटनमधल्या अनेक लोकांचं चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे वजन वाढत असल्याचं समोर आलंय.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते ब्रिटन हे आता नॅशनल ट्रेजडी होतंय. ब्रिटन सरकार मिष्ठान्न आणि पेयावर जास्त प्रमाणात कर आकारात नसल्यानं अनेकांना याची चटक लागल्याचं आरोग्यतज्ज्ञांचं म्हणणं आहे. या अतिलठ्ठपणामुळे अनेक लोकांना कमी रक्तदाब आणि कोलेस्टेरोल वाढल्याचं बोललं जातंय. तर अनेकांनी काम करणं थांबवल्यामुळे अतिलठ्ठपणा वाढत असल्याचं लंडनच्या इम्पेरियल कॉलेजचं म्हणणं आहे.
युरोपात ब्रिटन हे लठ्ठपणाच्या अतिधोकादायक सीमारेषेवर उभं आहे. युरोपमध्ये महिलांच्याही लठ्ठपणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. मेल्टा आणि तुर्कीत सध्या सर्वाधिक लठ्ठ माणसं आहेत. ब्रिटनमधल्या महिला लठ्ठपणात जवळपास आयर्लंड आणि मेल्टा या शहरांच्या बरोबरीला आलंय.