शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षीय तरूणीने विमानात दिला बाळाला जन्म, मग टॉयलेटमध्ये जाऊन केलं 'हे' धक्कादायक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 13:07 IST

काही घटना विचार करायलाही भाग पाडतात की, असं काय झालं असेल की, आजच्या काळात असंही होतं? अशीच एक धक्कादायक आणि विचार करायला भाग पाडणारी घटना समोर आली आहे. 

सोशल मीडियावर नेहमीच अशा काही बातम्या समोर येतात, ज्या वाचून व्यक्ती आतून हादरून जातात. इतकंच नाही तर विचार करायलाही भाग पाडतात की, असं काय झालं असेल की, आजच्या काळात असंही होतं? अशीच एक धक्कादायक आणि विचार करायला भाग पाडणारी घटना समोर आली आहे. 

एका आईने तिच्या बाळाला जन्म दिल्यावर लगेच आपल्यापासून वेगळं केलं. इतकंच नाही तर आपल्या काळजाच्या तुकड्याला आईने डस्टबिनमध्ये म्हणजे कचऱ्याच्या पेटीत फेकलं. त्यानंतर पोलिसांनी या निर्दयी आईला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार विमानात घडला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेडागास्करची (Madagascar) एक २० वर्षीय तरूणी एअर मॉरीशसच्या (Mauritius plane) विमानाने प्रवास करत होती. ही २० वर्षांची तरूणी १ जानेवारीला सर सीवोसागुर रामगुलाम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली होती. 

विमानाच्या स्टाफला तिच्यावर संशय आला होता की, तिने एका बाळाला जन्म दिला. यानंतर एअरफोर्स ऑफिसरने रूटीन कस्टम चेक दरम्यान वॉशरूमही चेक केलं. तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून त्यांना धक्का बसला. त्यांना दिसलं की, वॉशरूममधील कचरा पेटीत एक बाळ पडून आहे. हे बाळ टॉयलेट पेपरने गुंडाळलेलं आणि रक्ताने माखलेलं आहे.

अधिकाऱ्यांनी बाळाला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि त्याच्यावर उपचार सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसाार, बाळ पूर्णपणे ठीक आहे. यानंतर एका संशयित महिलेला पोलिसांनी पकडलं आणि ते बाळ तिचं आहे का असं विचारलं. तेव्हा तिने बाळ तिचं नसल्याचं सांगितलं.  पण नंतर मेडिकल चेकअप नंतर हे स्पष्ट झालं की, ते बाळ तिचंच आहे. महिला अजूनही पोलिसांच्या कस्टडीत आहे.

दोन वर्ष वर्क परमिटवर मॉरीशसला आलेल्या तरूणीची हॉस्पिटलमधून सुट्टी झाल्यावर चौकशी केली जाईल. तिच्यावर नवजात बाळाला सोडण्याचा आरोप लावण्यात आला आहे.   

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारीpregnant womanगर्भवती महिला