शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

इस्रायलकडून गाझा पट्टीवर हवाई हल्ला, लहान मुलांसह २० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 11:44 IST

Israel strikes : सोमवारी हमासने इस्रायलच्या (Israel) दिशेने १०० क्षेपणास्त्रे डागली होता. या हल्ल्याला इस्रायलकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले.

ठळक मुद्देनऊ लहान मुलांसह २० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ६५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

जेरूसलेम: इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरु झाले आहेत. सोमवारी हमासने इस्रायलच्या (Israel) दिशेने १०० क्षेपणास्त्रे डागली होता. या हल्ल्याला इस्रायलकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यामध्ये  नऊ लहान मुलांसह २० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ६५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. (20 Palestinians including 9 children killed as Israel strikes Gaza amid days of spiralling violence)

इस्रायल लष्कराने ट्विटमध्ये म्हटले आहे की, हवाई हल्ल्यात तीन हमास कार्यकर्त्यांना निशाना बनविण्यात आला आणि त्यांना ठार करण्यात आले. याचबरोबर 'देश मोठ्या सामर्थ्याने प्रत्युत्तर देईल', असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे. तसेच, जेरुसलेमच्या दिवशी, गाझामधील दहशतवादी संघटनांनी लाल रेषा ओलांडून जेरुसलेमच्या हद्दीत क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे, असे बेंजामिन नेतान्याहू म्हणाले.

दरम्यान, जेरूसलेमच्या अक्सा मशिदीबाहेर सोमवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यामध्ये शेकडो लोक जखमी झाले आहेत. त्यानंतर हमास संघटनेने इस्रायलला प्रत्युत्तर देण्याची भाषा सुरु केली. इस्रायलने जेरूसलेममध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांना घरे खाली करण्यास सांगितले आहे. जेणेकरून याठिकाणी यहुदी नागरिकांना राहता येईल. यावरुन पॅलेस्टिनी नागरिक इस्रायलमध्ये सातत्याने निदर्शने करत आहेत.

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील वाद?इस्रायलने 1967 साली मध्यपूर्वेतील युद्धानंतर जेरूसलेम ताब्यात घेतले होते. त्यानंतर इस्रायलयने हा परिसर यहुदी लोकांचा देश म्हणून घोषित केला होता. तेव्हापासून पॅलेस्टिनी नागरिक इस्रायलविरोधात संघर्ष करत आहेत. पॅलेस्टाईन स्वतंत्र होईल तेव्हा जेरुसलेम ही आमची राजधानी असेल, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, आता इस्रायलने जेरुसलेममध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांनाच बाहेर काढायला सुरुवात केली आहे.

शेख जर्राहमधून पॅलेस्टिनी नागरिकांना बाहेर काढतोय इस्रायलइस्रायलच्या सेंट्रल कोर्टाने पूर्व जेरूसलेममध्ये राहणाऱ्या चार पॅलेस्टाईन कुटुंबांना शेख जर्रा परिसरातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. कोर्टाने उजव्या विचारसरणीच्या इस्रायलींना या सर्व ठिकाणी स्थायिक होण्याचे आदेश दिले. इस्त्रायली सुप्रीम कोर्ट गुरुवारी या प्रकरणी निर्णय देणार होता. मात्र, हिंसक संघर्ष सुरू झाल्यामुळे सुनावणी १० मे पर्यंत टाळण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने इस्रायली जनतेच्या बाजूने निर्णय दिला तर पॅलेस्टाईन लोकांना आपली घरे सोडावी लागतील. या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायली पोलिसांनी बॅरियर लावले आहेत. जेणेकरून पॅलेस्टिनी नागरिक या भागात रमझानचे उपवास सोडण्यासाठी जमू नये. पॅलेस्टिनींनी इस्रायली पोलिसांच्या या कृतीवर आक्षेप घेत अधिकारांवर गदा आणली गेली असल्याचे म्हटले. तर, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे, असे सांगितले.

मुस्लिम आणि ज्यूंसाठी पवित्र आहे शेख जर्राहज्यू आणि मुस्लिम या दोघांसाठी धार्मिकदृष्ट्या शेख जर्रा प्रदेश महत्वाचा आहे. या कारणास्तव, ज्यू जेव्हा या भागात जातात तेव्हा तेथील मुस्लिमांशी त्यांचा तणाव वाढतो. असे म्हटले जाते की शेख जर्राचा इतिहास १२ व्या शतकापासून हुसाम अल दिन अल जर्राहीपासून सुरू होतो. हुसम हे तत्कालीन शक्तीशाली इस्लामिक जनरल सलादिनचे खासगी डॉक्टर होते. सलादिनच्या सैन्याने जेरुसलेवर ताबा मिळवला होता. अरबी भाषेत जर्राहचा अर्थ सर्जन होतो आणि शेख ही उपाधी आहे. ही उपाधी धार्मिक आणि समुदायाच्या नेत्याला देण्यात येते. या भागातच जर्राही यांचा मकबरा उभारण्यात आला. शेख जर्राह यांचा भाग जेरुसलेममधील उत्तर भागात आहे. याच्याजवळच हिब्रू विद्यापीठ आहे.

टॅग्स :Israelइस्रायलInternationalआंतरराष्ट्रीय