शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विमान अपघातातील मृतांच्या वारसांना मसालाकिंग दातार यांचे २० लाखांचे साह्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 02:53 IST

विमान दुर्घटनेत वैमानिक, सह-वैमानिक व प्रवाशांसह १८ जण मृत्युमुखी पडले.

दुबई : कोझिकोडे विमान अपघातातील मृतांच्या वारसांना वैयक्तिक साह्य म्हणून २० लाख रुपयांचा साह्य निधी देण्याचा संकल्प अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी जाहीर केला आहे. विमान दुर्घटनेत वैमानिक, सह-वैमानिक व प्रवाशांसह १८ जण मृत्युमुखी पडले.डॉ. दातार यासंदर्भात म्हणाले, ‘या विमानाचे सारथ्य भारतीय हवाई दलातून निवृत्ती घेऊन एअर इंडियात आलेले, अत्यंत अनुभवी व निष्णात वैमानिक कॅ प्टन दीपक वसंत साठे करीत होते. ते भारतीय हवाईदलाचे उत्कृष्ट व गौरवपूर्ण कामगिरी बजावलेले अधिकारी होते. माझे वडील दिवंगत महादेव दातार हेसुद्धा भारतीय हवाई दलात अधिकारी होते. त्यामुळे मला या दलाविषयी प्रबळ आत्मीयता आहे. विमान अपघाताची बातमी कानी पडताच त्यातील मृतांसाठी मदत करण्याची ऊर्मी मनात दाटून आली. या दुर्दैवी विमान फेरीतील अनेक प्रवासी परदेशातील त्यांचे रोजगार गमावलेले होते. अनेक जण व्हिजिट व्हिसाची मुदत संपल्यामुळे मायदेशी परत येत होते. अनेकांपुढे आर्थिक विवंचना होत्या. अशा स्थितीत मृत प्रवाशांवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांवरील किमान आर्थिक दडपण काहीसे हलके व्हावे म्हणून मी हा पुढाकार घेतला आहे. एअर इंडियाच्या आपत्ती व्यवस्थापन संघाशी थेट समन्वय साधून ही मदत गरजू लोकांच्या हाती पडेल यासाठी प्रयत्न करीत आहे. भारतीय कॉन्सुलेटचा या मोहिमेसाठीही पाठिंबा मिळत आहे.डॉ. दातार हे सध्या आणखी एका सामाजिक मदत उपक्रमात व्यग्र आहेत. कोविड-१९ साथीमुळे अरब देशांत अडकून पडलेल्या गरजू भारतीयांना मायदेशी सुखरूप पोहोचविण्यासाठी त्यांनी स्वनिधीतून दहा लाख दिºहॅमहून अधिक खर्च केला आहे. आतापर्यंत त्यांनी ३८०० हून अधिक भारतीयांना घरी सुरक्षित पोहोचवले आहे. गरजू भारतीय कामगारांच्या विमान तिकिटाचा व मोफत वैद्यकीय चाचणीचा खर्च डॉ. दातार उचलत आहेत. याखेरीज खाद्यपदार्थांच्या मोफत कीट पुरवणे व त्यांच्यासाठी मोफत क्वारंटाईनची व्यवस्था करणे, यासाठीही ते खर्च करीत आहेत.