बुर्किना फासोतील हॉटेलवर दहशतवादी हल्ला, २० ठार
By Admin | Updated: January 16, 2016 12:37 IST2016-01-16T04:35:13+5:302016-01-16T12:37:05+5:30
बुर्किना फासो या देशाची राजधानी वागडूगू येथील एका हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २० जण ठार झाले आहेत.

बुर्किना फासोतील हॉटेलवर दहशतवादी हल्ला, २० ठार
>ऑनलाइन लोकमत
वागडूगू, दि.१६ - बुर्किना फासो या देशाची राजधानी वागडूगू येथील एका हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २० जण ठार झाले आहेत.
वागडूगू येथील बहुचर्चित असलेल्या स्प्लेंडिड या हॉटेलवर माक्स लागून आलेल्या चार दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. येथील स्थानिक वेळेनुसार साडेसातच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला असून या हॉटेलमधील काही लोकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. तसेच, या दहशतवाद्यांनी हॉटेलच्या बाहेर असलेल्या दोन गाड्या पेटवून दिल्या आहेत. घटनास्थळी सुरक्षा दलाचे जवान दाखल झाले आहेत. जवानांनी हॉटेलचा परिसर ताब्यात घेतला असून दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, या गोळीबारात अद्याप कोणतीही जीवितहाणी झाली नसल्याचे समजते.