शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

७३ हजार लोकांना संसर्ग; कोरोनाचे १९०० बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 06:25 IST

७३ हजार लोकांना संसर्ग; उपचार करणारा डॉक्टर विषाणूचा बळी

बीजिंग : कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर ज्या इस्पितळांत उपचार सुरू आहेत, त्यापैकी एका इस्पितळाच्या संचालकाचा याच संसर्गामुळे मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. रुग्णांवर उपचार करणारे ६ कर्मचारी आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गामुळे मरण पावले आहेत. चीनमधील एकूण मृतांची संख्या आता १९00 वर गेली असून, रुग्णांची संख्या ७३ हजारांच्या आसपास आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सध्या वुहानमधील वुचांग इस्पितळात आहेत. त्या इस्पितळाचे संचालक व डॉ. ली झिमिंग यांचे निधन झाल्याचे आज जाहीर करण्यात आले. याआधी कोरोना विषाणू शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञाचाही संसर्गामुळे मृत्यू झाला होता, तसेच या विषाणूची कल्पना देणारे नेत्रचिकित्सक हली वेनलियांग हेही संसर्गामुळे मरण पावले होते. त्यांनी विषाणूची माहिती दिल्याबद्दल सरकारने त्यांना शिक्षा ठोठावली होती.

चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत असून, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रथमच अन्य देशांनी दिलेली मदत घेण्याचे चीन सरकारने ठरविले आहे. भारतातर्फे अशी मदत लवकरच पाठवण्यात येणार आहे. ही मदत नेणारे विमान येताना तेथील भारतीयांना घेऊ न येणार आहे. वुहान शहरात अद्याप सुमारे २00 भारतीय असल्याचे सांगण्यात येते. चीनमधील भारतीय दूतावास व भारताचे परराष्ट्र मंत्रालय या भारतीयांच्या संपर्कात आहे. वुहानमध्ये अनेक पाकिस्तानी विद्यार्थीही आहेत. त्यांच्याशी आता पाकिस्तानच्या चीनमधील दूतावासाने संपर्क साधला आहे. दोन पाकिस्तानी अधिकाऱ्यांना वुहानमध्ये जाण्यास चीननेही संमती दिली आहे.याशिवाय अमेरिकेकडून जी उपकरणे व औषधी पाठवण्यात येतील, त्यांच्यावर आयात शुल्क न आकारण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. आयात शुल्क न आकारल्याने औषधे व उपकरणे तुलनेने स्वस्तात मिळू शकतील. वुहान शहर हुबेई प्रांतात आहे. तेथील सार्वजनिक वाहतूक अद्याप बंद आहे. लोकांच्या बाहेर फिरण्यावरही निर्बंध आहेत. (वृत्तसंस्था)क्रूझवरील प्रवाशांना मायदेशी पाठवणारच्अमेरिका, ब्रिटन, आॅस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, दक्षिण कोरिया या देशांनी विशेष विमाने पाठवून क्रूझवरील आपल्या नागरिकांना परत आणण्याचे ठरविले आहे. मात्र, उपचारानंतर जे बरे झाले वा ज्यांना संसर्ग झाला नसल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे, त्यांनाच क्रूझमधून खाली उतरण्याची परवानगी देण्यात येईल, असे जपानने स्पष्ट केले आहे.जपानच्या योकोहामा बंदराबाहेर समुद्रात असलेल्या क्रूझवरील प्रवाशांमध्ये कोरोनाची लागण वाढत असल्याचे दिसून आले आहे. डायमंड प्रिन्सेस या क्रूझवरील आणखी ८८ जणांना लागण झाल्याने कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५४२ झाली आहे. त्यात पाच भारतीय असून, त्यापैकी तिघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे आणि दोघांवर उपचार सुरू आहेत.सुदैवाची बाब म्हणजे ज्या भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे, त्या सर्वांवर वेळेत उपचार झाले. त्यामुळे एकही भारतीय या आजाराचा बळी ठरलेला नाही. त्या क्रूझवर एकूण ३७00 लोक असून, त्यात १३८ भारतीय कर्मचारी व प्रवासी आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीन