१८८ जणांना इजिप्तमध्ये मृत्युदंड
By Admin | Updated: December 4, 2014 00:54 IST2014-12-04T00:54:24+5:302014-12-04T00:54:24+5:30
इजिप्तमधील एका न्यायालयाने गिझा येथील पोलीस ठाण्यावर हल्ला करणा-या १८८ लोकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

१८८ जणांना इजिप्तमध्ये मृत्युदंड
कैरो : इजिप्तमधील एका न्यायालयाने गिझा येथील पोलीस ठाण्यावर हल्ला करणा-या १८८ लोकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. माजी अध्यक्ष मोहम्मद मुर्सी यांना बडतर्फ केल्यानंतर या लोकांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. हे प्रकरण आता वरिष्ठ धार्मिक नेत्यांकडे जाईल. केरदासा येथील पोलीस ठाण्यावर १४ आॅगस्ट २०१३ रोजी हल्ला झाला होता. कैरो, गिझा येथील निदर्शने करणाऱ्या जमावाला पांगविल्यानंतर हा हल्ला करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)