Video: इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन पडली 2 वर्षाची चिमुरडी पण...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 15:26 IST2019-06-27T15:26:19+5:302019-06-27T15:26:34+5:30

दोहा मोहम्मद नावाची मुलगी आपल्या घरातील बाल्कनीमध्ये खेळत होती. त्यावेळी इमारतीच्या खाली उभा असणारा 17 वर्षीय युवकाचं या मुलीकडे लक्ष गेलं

17 year old Algerian youngster catches 2 year old girl mid air after she fell from the 2nd floor of a building | Video: इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन पडली 2 वर्षाची चिमुरडी पण...  

Video: इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन पडली 2 वर्षाची चिमुरडी पण...  

नवी दिल्ली - तुर्की येथील इस्तांबुलमधील धक्कादायक सीसीटीव्ही समोर आला आहे. एका दुमजली इमारतीवरुन 2 वर्षाची चिमुरडी खाली पडली. मात्र त्याचवेळी इमारतीच्या खाली उभ्या असणाऱ्या युवकाने त्या मुलीला झेलल्याने तिचा जीव वाचला. 

मिडीया रिपोर्टनुसार दोहा मोहम्मद नावाची मुलगी आपल्या घरातील बाल्कनीमध्ये खेळत होती. त्यावेळी इमारतीच्या खाली उभा असणारा 17 वर्षीय युवकाचं या मुलीकडे लक्ष गेलं तेव्हा बाल्कनीतील खिडकीतून तोल जाऊन ती खाली पडली मात्र या युवकाने तिला हातात झेललं त्यामुळे तिचे प्राण वाचले. 

17 वर्षीय फेउजी जबाट या युवकाच्या प्रसंगावधनामुळे 2 वर्षाच्या या चिमुरडीचा जीव वाचला. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लोकांनी या युवकाचं मनभरुन कौतुक केलं. 


 

Web Title: 17 year old Algerian youngster catches 2 year old girl mid air after she fell from the 2nd floor of a building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.