बुर्किना फासोमध्ये कॅफेवर दहशतवादी हल्ला, 17 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 11:05 IST2017-08-14T10:08:36+5:302017-08-14T11:05:10+5:30
बुर्किना फासोची राजधानी औगादौगौ येथे एका कॅफेवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्ल्यात जवळपास 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

बुर्किना फासोमध्ये कॅफेवर दहशतवादी हल्ला, 17 जणांचा मृत्यू
औगादौगौ, दि. 14 - बुर्किना फासोची राजधानी औगादौगौ येथे एका कॅफेवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्ल्यात जवळपास 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर 8 जण जखमी झाले आहेत.
परदेशी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या एका तुर्की कॅफेवर गेल्या दोन वर्षांमध्ये झालेला हा दुसरा हल्ला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. बु्र्किना फासो हा देश दक्षिण आफ्रिकेच्या मध्यभागी असून हा सर्वात गरीब देशांमधील एक देश आहे.
बुर्किना फासो सरकारनंही हल्ल्याच्या वृत्ताला दुजारो दिला आहे. बुर्किना फासो सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये जवळपास 17 जणांचा
समावेश असून 8 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 4 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजीज इस्तांबुलजवळ एका कॅफेवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त मिळताच सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान या हल्ल्यानं जानेवारी 2016 मध्ये झालेल्या अशाच प्रकारच्या हल्ल्याची आठवण करुन दिली, ज्या हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला होता.
17 dead in Burkina Faso cafe attack: govt (AFP)
— ANI (@ANI) August 14, 2017