ऐकावे ते नवलच...! या रुग्णालयात एकाचवेळी 16 नर्स प्रेग्नंट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 13:49 IST2018-08-22T13:40:49+5:302018-08-22T13:49:37+5:30
या परिचारिकांना त्यांनी फेसबुकवर ग्रुप बनविला तेव्हा या अनोख्या योगायोगाबाबत समजले.

ऐकावे ते नवलच...! या रुग्णालयात एकाचवेळी 16 नर्स प्रेग्नंट!
ऐरिझोना : एकाच इस्पितळामध्ये एका दिवशी 16 प्रसुत्या झाल्याचे बऱ्याचदा घडत असेल. परंतू, एकाच इस्पितळात काम करणाऱ्या एक-दोन नव्हे तर तब्बल 16 महिला एकाच काळात गर्भवती राहिल्याचा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. या परिचारिकांना त्यांनी फेसबुकवर ग्रुप बनविला तेव्हा या अनोख्या योगायोगाबाबत समजले. या सर्वांची प्रसुती ऑक्टोबर ते जानेवारी या काळामध्ये होणार आहे.
बॅनर डेझर्स मेडिकल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एक नर्स रॉशेल शेरमन यांनी सांगितले की, फेसबुक ग्रुप बनवायच्या आधी आमच्यापैकी कोणालाच याची कल्पना नव्हती की किती परिचारिका गर्भवती आहेत. तर आणखी एका नर्सने गमतीने सांगितले की, आम्ही एकत्रित सुटी घालवण्यासाठी असा प्लान केला.
या सर्व नर्स एकाचवेळी सुटीवर जाणार असल्याने मेडिकल सेंटरमध्ये नर्सची कमतरता भासणार आहे. याची सोय आधीच करण्यात आल्याचे इस्पितळाच्या व्यवस्थापनाने सांगितले. सध्या या नर्स इस्पितळातच काम करत आहेत. त्यांचे डोहाळे पुरविण्याचे कामही इस्पितळाच्या कँटीनने केले आहे.