वांशिक हिंसाचारात १६ ठार
By Admin | Updated: April 11, 2017 01:40 IST2017-04-11T01:40:28+5:302017-04-11T01:40:28+5:30
दक्षिण सुदानमधील वावू येथे झालेल्या वांशिक हल्ल्यात सोमवारी जवळजवळ १६ जण ठार झाले. या वृत्ताची पुष्टी युनोने केली. गत काही वर्षांपासून गृहयुद्धाने

वांशिक हिंसाचारात १६ ठार
ऑनलाइन लोकमत
खाटरूम, दि.11 - दक्षिण सुदानमधील वावू येथे झालेल्या वांशिक हल्ल्यात सोमवारी जवळजवळ १६ जण ठार झाले. या वृत्ताची पुष्टी युनोने केली. गत काही वर्षांपासून गृहयुद्धाने ग्रस्त असलेल्या सुदानमध्ये वांशिक हिंसाचार सुरू असून, तेथील सैनिक तथा अर्धसैनिक दलाचे जवान नागरिकांची मदत घेत, तेथील अल्पसंख्याकांवर हल्ले करत असल्याचा आरोप होतो. दरम्यान, युनोचे शांतीदूत या भागात पोहचले असून, त्यांची या भागातील पाहाणी मंगळवारीदेखील सुरू राहणार असल्याचे युनोचे प्रवक्ता स्टेफन दुजारिक यांनी स्पष्ट केले.