शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 06:11 IST

Iran Israel war news latest update: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २०२५ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. 

पॅरिस : इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित असलेले १४ शास्त्रज्ञ हे त्या देशावर केलेल्या हल्ल्यात ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. हे शास्त्रज्ञ इराणच्या अणुकार्यक्रमाचा आघारस्तंभ असले तरी त्यांच्या मृत्यूमुळे हा प्रकल्प ठप्प होईल अशा भ्रमात कोणीही राहू नये, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

इस्रायलचे फ्रान्समधील राजदूत जोशुआ झार्का म्हणाले की, या हल्ल्यांमुळे इराणकडील सर्व महत्त्वाचे अणुशास्त्रज्ञ मरण पावले असल्याने इराणला अणुप्रकल्प पूर्ण करणे आता शक्य होणार नाही.  मात्र, झार्का यांचे हे मत अणुऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांना मान्य नाही. 

ते म्हणाले की, अणुप्रकल्प पूर्ण करू शकतील असे इराणकडे आणखी काही शास्त्रज्ञ आहेत. केवळ लष्करी कारवाईने इराणकडील अणुविषयक ज्ञान व साधने हिरावून घेता येणार नाही. 

आम्हाला खरी युद्धबंदी हवी : चीन

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी तुर्कस्थानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली. चीन इराण आणि इस्रायल यांच्या संपर्कात असल्याचे नमूद करून खऱ्या अर्थाने या देशांत युद्धबंदी व्हावी, ही चीनची इच्छा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

‘नाटो’ देश एकवटले

जगातील सर्वात मोठी लष्करी सहकार्य संघटना असलेल्या ‘उत्तर अटलांटिक करार संघटनेच्या’ (नाटो) ऐतिहासिक परिषदेत सहभागी होण्यासाठी जगातील प्रमुख नेते नेदरलँडची राजधानी द हेग येथे दाखल होत आहेत. 

संरक्षण क्षेत्रावरील खर्चात वाढ करण्याबाबत संघटनेच्या ३२ सदस्य देशांत सहमतीच्या दृष्टीने एकमत होते की विविध मुद्द्यांवरील मतभेदांमुळे निर्माण झालेली मतभेदांची दरी अधिक रुंदावते हे या परिषदेतून स्पष्ट होईल.  

संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी बाह्य देशांच्या आक्रमणापासून बचावासाठी आपल्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) पाच टक्के रक्कम संरक्षणासाठी खर्च करण्याचा मुद्दा यात प्रमुख असणार आहे. 

हे लक्ष्य गाठण्यासाठी सर्वांनी समर्थन करावे, अशी बड्या सदस्य राष्ट्रांना या परिषदेकडून अपेक्षा आहे.

चीन व तेलाचे नाव घेतले अन् दर धाडकन कोसळले

चीन आता इराणकडून तेल खरेदी करणे सुरू ठेवू शकतो. अमेरिकेकडूनही ते भरपूर तेल खरेदी करतील, अशी आशा आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणताच कच्च्या तेलाचे दर कोसळले आहेत. 

ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे इराणला मोठा दिलासा मिळेल. ट्रम्प यांनी ही माहिती देताच जगभरात कच्च्या तेलाचे दर कोसळले. अमेरिकन कच्चे तेल थेट ६५ डॉलर प्रतिबॅरल इतके खाली आले आहे. 

चीन दरमहा इराणमधून सुमारे ४३ दशलक्ष बॅरल तेल आयात करतो, जे इराणच्या तेल निर्यातीच्या सुमारे ९० टक्के आणि चीनच्या कच्च्या तेलाच्या खरेदीच्या सुमारे १३.६ टक्के आहे.

ट्रम्प यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन

इस्रायल व इराणमधील युद्धबंदीमध्ये मध्यस्थी करण्याच्या 'असाधारण आणि ऐतिहासिक भूमिकेसाठी' अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २०२५ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. 

अमेरिकेचे हाऊस रिप्रेझेंटेटिव्ह बडी कार्टर यांनी त्यांचे नामांकन केले आहे. नोबेल शांतता पुरस्कार समितीला लिहिलेल्या पत्रात, कार्टर यांनी '१२ दिवसांचे युद्ध' संपवण्याचे श्रेय ट्रम्प यांना दिले. 

सत्तापालट अन् थेट कोलांटीउडी

इराणमध्ये सत्तापालटाचे संकेत देणारे ट्रम्प यांनी पुन्हा कोलांटउडी घेत आपली तशी इच्छा नसल्याचे म्हटले आहे. ‘नाटो’ परिषदेला रवाना होताना त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, ‘सर्वत्र लवकरात लवकर शांतात नांदावी, हा माझा हेतू आहे.’  अशा सत्तापालटामुळे अशांती पसरते, आम्हाला ती नको आहे, असे ट्रम्प म्हणाले. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी इराणमध्ये सर्वोच्च नेत्याला हटवून सत्ताबदलाचे संकेत दिले होते.  मात्र त्यांनी शब्दावरून माघारी घेतली.

असा झाला शस्त्रसंधीनंतर संघर्ष

इराणने सोमवारी इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरू केला होता. मंगळवारी पहाटे ४ वाजेपर्यंत इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केले. सूर्योदयाच्या सुमारास इराणच्या क्षेपणास्त्र माऱ्यामुळे इस्रायली नागरिक जीव वाचविण्यासाठी बंकरमध्ये आश्रयाला गेले. 

मंगळवारी सकाळी ७:३० वाजता इराणने शस्त्रसंधी मान्य केल्याची घोषणा केली. इस्रायली लष्कराने सांगितले की, शस्त्रसंधी होण्यापूर्वी इराणने २० क्षेपणास्त्रे डागली. त्यातील काही नागरी वस्त्यांतील इमारतींना धडकली. या हल्ल्यात इस्रायलचे ४ नागरिक मरण पावले व २० जण जखमी झाले. 

इराणने कतारमधील अल् उदीद येथील अमेरिकेच्या तळावर मंगळवारी हल्ला केला होता. त्यात कोणीही जखमी झाले नाही. पण, त्या घटनेनंतर अमेरिकेने शस्त्रसंधी लागू झाल्याची घोषणा केली.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पwarयुद्धDeathमृत्यूAmericaअमेरिका