शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चीनला चक्रीवादळाचा तडाखा, मकाऊ आणि हाँगकाँगमधील जनजीवन विस्कळीत ; 12 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 17:59 IST

मकाऊ, दि. 24 - काल बुधवारी चीनच्या किनारपट्टीला चक्रीवादळ धडकले आहे. या वादळामुळे जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे मकाऊ ...

ठळक मुद्देचक्रिवादळाची तीव्रता ही दहाव्या श्रेणीतील पावसाची ही स्थिती पाहात मृतांची संख्या वाढण्याची भीती समुद्र किनाऱ्याला धडकलेल्या चक्रीवादळामुळे समुद्रात मोठ्या लाठा उसळत आहेत.

मकाऊ, दि. 24 - काल बुधवारी चीनच्या किनारपट्टीला चक्रीवादळ धडकले आहे. या वादळामुळे जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे मकाऊ आणि हाँगकाँगमधील नद्यांना महापूर आला आहे. जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मिळालेल्या वृत्तानुसार दक्षिण चीनमध्ये आलेल्या या वादळामुळे आतापर्यंत 12 जणांचा मुत्यू झाला आहे. मकाऊच्या पोर्तुगीज वसाहतीत आठ जणांचा बळी गेला असून पावसाची ही स्थिती पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पावसामुळे मृत पावलेल्यामध्ये एका 62 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. पावसामध्ये एका कारने धडकल्यामुळे 45 वर्षीय व्यक्तीचाही मृत्यू झाला. मकाऊमध्ये पावसामुळे भींत अंगावर कोसळून एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

दक्षिण चीनमध्ये आलेल्या ह्या चक्रीवादळाची तीव्रता ही दहाव्या श्रेणीतील असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या चक्रीवादळामुळे 450 विमानाची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. काल मकाऊ आणि हाँगकाँगमधील सर्व शाळा, सरकारी कार्यालये आणि स्टॉक एक्सचेंज बंद होते. समुद्र किनाऱ्याला धडकलेल्या चक्रीवादळामुळे समुद्रात मोठ्या लाठा उसळत आहेत. त्यामुळे येथील मच्छीमारी बंद करण्यात आली आहे.

मकाऊ आमि हाँगकाँगमधील काही भागात काल वीज, मोबाइल आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली होती. या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू असलेल्या भागात 155 किमी प्रती तास वेगाने वारा वाहत आहे. तुफानी वारा आणि मुसळधार पावसामुळे येथील प्रसिद्ध विक्टोरिया हार्बरला त्याचा फटका बसला आहे. गेल्या पाच वर्षातील चीनमध्ये आलेलं हे सर्वात मोठ वादळ असल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितले आहे.

चक्रीवादळामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओतून दिसून येत आहे.दरम्यान गेल्यावर्षीही चीनमध्ये पावसाने थैमान घातले होते. यामध्ये 111 लोकांचा मृत्यू झाला होता. चीनच्या वायव्येकडील शानाक्सी प्रांतात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. दरड कोसळल्याने व वाहून गेल्याने 111 लोक मरण पावले होते तर 167 लोक बेपत्ता झाले होते.

टॅग्स :chinaचीनriverनदीSocial Mediaसोशल मीडिया