चीनला जोरदार भूकंपाचा धक्का, 100 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 22:45 IST2017-08-08T22:44:21+5:302017-08-08T22:45:41+5:30
चीनच्या नैऋत्यकडच्या भागाला जोरदार भूकंपाचा धक्का बसला आहे.

चीनला जोरदार भूकंपाचा धक्का, 100 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
बीजिंग, दि. 8 - चीनच्या नैऋत्यकडच्या भागाला जोरदार भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 6.5 एवढी असून, यात 100हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, असं वृत्त एएफपीनं दिलं आहे. परंतु झिनहुआ न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, सध्या 5 जणांचा मृत्यू झाला असून, 60 जण जखमी झाले आहेत. तसेच 30 जण गंभीररीत्या जखमी आहे. चीनच्या आपत्ती नियंत्रण विभागानं या भूकंपात 100 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली आहे, असं वृत्त एएफपीनं दिलं आहे. भूकंपामुळे जवळपास 1,30,000 घरांचं नुकसान झाल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. 41 वर्षांपूर्वी 28 जुलै 1976 मध्ये चीनमध्ये 8.3 तीव्रतेने भूकंप झाला होता. या भूकंपात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. राजधानी बीजिंगच्या उत्तर-पूर्वमध्ये स्थित तांगशान शहर उद्ध्वस्त झाले होते. शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयाची इमारत कोसळून जमीनदोस्त झाली होती. त्यामध्ये जवळपास 2,000 लोकांचा मृत्यू झाला होता. भूकंप इतका मोठा होता, की रस्ते, पूल, रेल्वे स्टेशन, घरे आणि कंपन्या उद्ध्वस्त होऊन धुळीस मिळाल्या होत्या.