शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

नारायण इंगळे नावाचा अनाथ बालक, झाला वनांचा पालक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 08:12 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील गुणवत्तेवर वनक्षेत्रपालपदी निवड.

ठळक मुद्देमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील गुणवत्तेवर वनक्षेत्रपालपदी निवड.

संदीप शिंदेलातूर : अनाथ असलेला नारायण इंगळे हा बालपणी रेल्वेने भटकत होता. तेव्हा पोलिसांनी त्यास शासकीय निरीक्षणगृहात पाठविले. तिथेच राहून त्याने अभियांत्रिकीतील पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर एमपीएससी परीक्षेची तयारी केली आणि त्यातही भरारी घेतल्याने वनक्षेत्रपालपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने लागू केलेल्या अनाथ आरक्षणाचा तो पहिला लाभार्थी ठरला.

मूळचा बीड जिल्ह्यातील जोडवाडी येथील रहिवासी असलेल्या नारायणचे आई-वडिलांचे छत्र बालपणीच हरवले. त्यामुळे नारायण रेल्वेनेच भटकंती करत असे. जालना आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील सातवणा रेल्वेस्टेशनवर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन जालना येथील बाल निरीक्षणगृहात पाठविले. तेथे दीड वर्ष राहिल्यानंतर मुरुड येथील जवाहर मुलांचे कनिष्ठ बालगृहात अधीक्षिका सिंधुताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. परभणी येथील तंत्रनिकेतनमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. 

औरंगाबाद येथील श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीईची पदवी प्राप्त करीत एका खासगी कंपनीत नोकरी सुरू केली. पण अधिकारी होण्याची मनीषा असल्याने नारायणने लातूर आणि पुणे येथे मित्राकडे राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. त्यातच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी ओळख झाल्याने त्यांच्याकडेच नारायणने कार्यालयीन सहायक म्हणून नोकरी सुरू केली. त्यांनी स्वत:च्या निवासस्थानी नारायणची राहण्याची व्यवस्था केली. कार्यालयीन काम करीत अभ्यासाला प्राधान्य देत नारायणने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेमधून त्याची वनक्षेत्रपालपदी निवड झाली. २ एप्रिल २०१८ रोजी राज्य सरकारने  अनाथ मुलांसाठी शासकीय नोकरीत दिलेल्या अनाथ आरक्षणाचा तो पहिला लाभार्थी ठरला. 

अनाथ म्हणून खचून जाऊ नका...प्रत्येक अनाथ मुलाच्या मनात आई-वडील नसल्याची खंत असते. मात्र, खचून न जाता आयुष्याची लढाई जिंकणे महत्त्वाचे असते. अनाथांना नोकरीत आरक्षण देण्यात आले आहे. हा आशेचा किरण आहे. कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि महत्त्वाकांक्षा असेल तर यशाला नक्कीच गवसणी घालता येते. 

नारायण इंगळे, अनाथ आरक्षणाचा पहिला लाभार्थी

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाMaharashtraमहाराष्ट्रInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी