इंजिनिअर युवतीनं 'या' कामासाठी नोकरी सोडली; 'Microsoft वाली दीदी' फेमस झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 17:06 IST2023-08-20T17:06:08+5:302023-08-20T17:06:24+5:30

श्रद्धाला मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ महिने इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. मायक्रोसॉफ्टमधील कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणामुळे ती प्रभावित झाली

The engineer girl left her job for New Creative; 'Microsoft wali didi' became famous | इंजिनिअर युवतीनं 'या' कामासाठी नोकरी सोडली; 'Microsoft वाली दीदी' फेमस झाली

इंजिनिअर युवतीनं 'या' कामासाठी नोकरी सोडली; 'Microsoft वाली दीदी' फेमस झाली

श्रद्धा खापराने अगदी लहान वयातच खूप नाव कमावले आहे. लोक तिला 'मायक्रोसॉफ्ट वाली दीदी' किंवा 'श्रद्धा दीदी' या नावाने ओळखतात. ती 'अपना कॉलेज' यूट्यूब चॅनलची फाऊंडर आहे. ती या चॅनेलवर शैक्षणिक व्हिडिओ टाकते. अनुभवी आयटी कंपनी मायक्रोसॉफ्टमधील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिने स्वत:चं यूट्यूब चॅनल सुरू केले. इन्स्टाग्रामवर लाखो लोक तिला फॉलो करतात. ती हरियाणातील एका छोट्या गावातली मात्र तिचा इथपर्यंतचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.

श्रद्धा खापराचा जन्म हरियाणातील एका छोट्या गावात झाला. ती फक्त २३ वर्षांची आहे. ती तिच्या गावातील पहिली इंजिनिअर आहे. गावात चांगल्या शाळा नसल्यामुळे ती पुढील शिक्षणासाठी श्रद्धाने दिल्ली गाठली. श्रद्धाने 'जैन भारती मृगावती विद्यालय'मधून शालेय शिक्षण घेतले. तिला १०वीत १० CGPA आणि १२वीत 94.4% गुण मिळाले. २०१७-२१ पासून तिने नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NSIT) मधून संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. तिला अभियांत्रिकीमध्ये ८.८ ग्रेड मिळाले.

श्रद्धाला मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ महिने इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. मायक्रोसॉफ्टमधील कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणामुळे ती प्रभावित झाली. या कामाची पद्धत प्रत्येकाने अनुभवली पाहिजे, असे तिचे मत आहे. त्यानंतर तिला DRDO मध्ये १ महिन्यासाठी संशोधन प्रशिक्षणार्थी म्हणून इंटर्नशिप मिळाली. जुलै २०२१ मध्ये, तिची तेलंगणात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून मायक्रोसॉफ्टमध्ये निवड झाली.

मात्र, स्वत:चं काहीतरी करण्याच्या इच्छेने श्रद्धाचे मन रमत होते. तिने मायक्रोसॉफ्टमध्ये केवळ ५ महिने काम केले. यानंतर श्रद्धाने 'अपना कॉलेज' नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केले. याला चाहत्यांचाही उदंड प्रतिसाद मिळाला. ती तिच्या चॅनेलवर शैक्षणिक व्हिडिओ पोस्ट करू लागली. इंस्टाग्रामवर तिचे ३ लाख ५४ हजार फॉलोअर्स आहेत. तिची ओळख 'मायक्रोसॉफ्ट वाली दीदी' अशी झाली. यूट्यूब व्हिडिओ आणि इतर माध्यमातून श्रद्धा महिन्याला दीड लाखाहून अधिक कमाई करते.

Web Title: The engineer girl left her job for New Creative; 'Microsoft wali didi' became famous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.