CoronaVirus News: देवमाणूस! अवघ्या १ रुपयांत उद्योजक सिलिंडर भरुन देतोय; शेकडोंचे प्राण वाचवतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 14:17 IST2021-04-27T14:11:36+5:302021-04-27T14:17:29+5:30

CoronaVirus News: सिलिंडर वाहतूक करणारी वाहनं अडवली जाऊ नये म्हणून काढलं जातंय १ रुपयांचं सांकेतिक बिल

Steel Trader Oxygen Service Daily Refilling 2500 Cylinders Free Of Cost | CoronaVirus News: देवमाणूस! अवघ्या १ रुपयांत उद्योजक सिलिंडर भरुन देतोय; शेकडोंचे प्राण वाचवतोय

CoronaVirus News: देवमाणूस! अवघ्या १ रुपयांत उद्योजक सिलिंडर भरुन देतोय; शेकडोंचे प्राण वाचवतोय

हमीरपूर: देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. देशातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सिजन सिलिंडर, रेमडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण सुरू आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काहीजण काळाबाजार करत आहेत. तर काही जण या परिस्थितीत तन-मन-धनानं गरजूंना मदत करत आहेत. उत्तरप्रदेशातल्या हमीरपूरमध्ये ऑक्सिजन प्लांट चालवत असलेले योगेश अग्रवाल अशांपैकीच एक. रिमझिम इस्पात लिमिटेडचे सीएमडी असलेले योगेश अग्रवाल सध्या दररोज २५०० ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा गरजूंना करत आहेत. 

मोफत लसीकरणाचा निर्णय कधी?; अजित पवार म्हणाले, जरा थांबा; नाहीतर तुम्हीच म्हणाल....

हमीरपूरमध्ये असलेल्या अग्रवाल यांच्या प्लांटमध्ये होणारं औद्योगिक उत्पादन कमी करण्यात आलं आहे. सध्या वैद्यकीय वापरासाठीच्या सिलिंडरवर भर देण्यात आला असून त्यासाठी केवळ एक रुपयाचं बिल दिलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे योगेश यांनी ऑक्सिजन सिलिंडर गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून कॉम्प्रेसरसह बाकी मशीन्स लावल्या. 

योगेश अग्रवाल यांनी सध्या स्टिल उत्पादन ५० टक्क्यांनी कमी केलं आहे. आता दिवसाकाठी त्यांच्या प्लांटमध्ये २५०० ऑक्सिजन सिलिंडर्स भरले जात आहेत. त्यांचे ५० कर्मचारी यासाठी काम करत आहेत. सिलिंडर वाहून नेले जाणारे ट्रक रस्त्यात अडवले जाऊ नये यासाठी केवळ १ रुपयाचं सांकेतिक बिल घेतलं जात आहे. कानपूर, लखनऊ, बुंदेलखंडमध्ये प्राधान्यानं सिलिंजर पुरवले जात आहेत. याशिवाय मेरठ, नोएडा, पिलीभीतसह संपूर्ण उत्तर प्रदेशात सिलिंडर पाठवण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी अधिक काम करावं यासाठी त्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जात आहे.

Web Title: Steel Trader Oxygen Service Daily Refilling 2500 Cylinders Free Of Cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.