शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
4
तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
5
“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
6
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
7
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
8
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
9
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
10
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
12
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
13
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
14
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
15
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
16
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
17
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
18
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
19
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
20
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
Daily Top 2Weekly Top 5

दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी! पोस्टमनची लेक झाली ‘सीए’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 08:41 IST

अत्यंत कठीण समजली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण करून कृतीतून सिद्ध केले आहे.

कांता हाबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नेरळ : ‘दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी’ ही म्हण नेरळ गावातील पोस्टमनच्या लेकीने सिद्ध करून दाखवली आहे. मुलीला तिच्या स्वप्नापर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करणाऱ्या वडिलांच्या हातात लेकीने जिद्दीने मिळवलेली सीएची  पदवी ठेवताच बापाची छाती अभिमानाने फुलून आली आहे. भारतीय टपाल खात्यात पोस्टमन म्हणून सेवा बजावणारे बाळकृष्ण दाभणे व त्यांची कन्या सायली सुनीता हिने  हे अत्यंत कठीण समजली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण करून कृतीतून सिद्ध केले आहे. 

पोस्टमनची लेक झाली ‘सीए’ 

उठता-बसता येईल, असं साधसं घर, दिवसरात्र राबल्यानंतरही मिळणारे मर्यादित उत्पन्न आणि रोजच्या गरजांसाठी द्यावी लागणारी झुंज अशा खडतर परिस्थितीतून सायलीचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. 

वडील पोस्टमन म्हणून प्रामाणिकपणे काम करत असताना आई सुनीता दाभणे यांनी संसार सांभाळत मुलीच्या स्वप्नांना बळ देत तिच्या शिक्षणाला पाठिंबा दिला. 

मुलीचं शिक्षण हेच आमचं भांडवल, या विचारावर ठाम राहत दोघांनीही अडचणी कधीच पुढे येऊ दिल्या नाहीत. प्रसंगी पोटाला चिमटा काढला, पण मुलीच्या शिक्षणात खंड पडून दिला नाही.

प्रेरणादायी यश

भारतीय टपाल खात्यात पोस्टमन म्हणून सेवा बजावणारे बाळकृष्ण दाभणे यांनी आयुष्यभर  सायकलवरून प्रवास करून इमानेइतबारे नोकरी आली. मुलीच्या शिक्षणासाठीची त्यांची धडपड सर्व गावाने पाहिली असून त्यांच्या लेकीनेही याचा जाण ठेवत मिळवलेले हे यश इतरांसाठी नक्कीच प्ररेणादायी आणि मार्गदर्शक आहे. 

शिस्त, नियोजन, आत्मविश्वासाची त्रिसूत्री

मुलीनेही याची जाण ठेवत सीए परीक्षेच्या तयारीदरम्यान उभी राहिलेले अनेक संकटे, अपयशाचे क्षण, आर्थिक मर्यादा, मानसिक ताण याच्या धीराने लढा दिला. प्रत्येक अपयशाला शिकवण मानून झोप, आराम, सण-समारंभ बाजूला ठेवून तिने स्वत:ला अभ्यासात झोकून दिले. 

कमी साधनांतूनही शिस्त, नियोजन आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या बळावर तिने परीक्षा उत्तीर्ण करून यशाला गवसणी घातली आहे. सायली दाभणे हिचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण हे नेरळ विद्यामंदिर नेरळ या शाळेत झाले, तर अकरावी, बारावी तसेच बीएपर्यंचे शिक्षण हे सीएचएम कॉलेज उल्हासनगर येथे झाले. 

सीए होण्यासाठी तिचे खूप प्रयत्न सुरू होते, तरंतू कोविडच्या काळात ती परीक्षा देवू शकली नाही. त्यामुळे तिचे हे स्वप्न अर्पूण राहिले होते. ते तिने दुसऱ्याच प्रयत्नात पूर्ण केले आहे. दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला असून ती सध्या सीएच प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेत आहे.

आई-वडिलांचा विश्वास हेच माझं खरं भांडवल होतं. परिस्थिती आपल्याला थांबवू शकत नाही, आपणच थांबायचं ठरवलं तरच अपयश येत, हा मूलमंत्र गाठीशी बांधत जिद्दीने अभ्यास करून परीक्षा दिली आणि त्यात यशही मिळाले. सायली सविता बाळकृष्ण दाभणे

आज नेरळमधील सामान्य पोस्टमनची मुलगी ‘सीए’ झाली असून केवळ एका कुटुंबाची यशोगाथा नाही, तर ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण आहे. त्यामुळे मोठी स्वप्ने ठेवा, प्रामाणिकपणे मेहनत करा, यश तुमच्याच दारात येऊन उभं राहील.  - बाळकृष्ण दाभणे 

English
हिंदी सारांश
Web Title : Postman's daughter clears CA exam, fulfilling father's dreams.

Web Summary : Nerul postman's daughter, Sayali Dabane, cleared the CA exam through perseverance. Her father's dedication and her hard work overcame financial constraints. She balanced studies with family responsibilities, proving that determination leads to success. Her achievement inspires many.
टॅग्स :chartered accountantसीएPost Officeपोस्ट ऑफिस