शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

IAS Success Story: वडिलांनी घर विकून UPSC च्या तयारीसाठी पाठवलं; पहिल्या प्रयत्नात प्रदीप झाला IRS, नंतर बनला IAS 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 10:30 AM

UPSC परीक्षांमध्ये अनेकदा उमेदवाराला पहिल्या प्रयत्नात यश मिळतं. परंतु IAS अधिकारी होण्यासाठी ते पुन्हाही प्रयत्न करताना दिसतात.

ठळक मुद्देप्रदीपच्या युपीएससीच्या स्वप्नासाठी वडिलांनी विकलं होतं घरपहिल्या प्रयत्नात झाला आयआरएस, दुसऱ्या प्रयत्नात झाला आयएएस

Success Story Of IAS Topper Pradeep Singh: २०१९ मध्ये पार पडलेल्या युपीएससीच्या परीक्षांमध्ये संपूर्ण भारतातून २६ वा क्रमांक पटकावलेल्या प्रदीप सिंह यांची गोष्ट नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. प्रदीपच्या वडिलांनी त्याच्या युपीएससीच्या तयारीसाठी आपलं घर विकलं आणि त्याला दिल्लीला पाठवलं होतं. प्रदीपनं जवळपास दीड वर्ष दिवसरात्र एक करून या परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्णही झाला. परंतु रँकनुसार त्याला आयआरएस सेवा मिळाली. लहानपणापासूनच प्रदीपचं स्वप्न एक आयएएस अधिकारी बनण्याचं होतं. म्हणूनच त्यानं दुसरा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याचा संपूर्ण भारतातून २६ वा क्रमांक आला आणि त्याचं स्वप्न पूर्ण झालं.प्रदीप मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा आणि लहानपणापासूनच अभ्यासातही हुशार. याचमुळे त्याच्या कुटुंबीयांना त्याला युपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नव्हती. यासाठीच प्रदीपनं पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. दिवसरात्र मेहनत करून त्यांनं पहिल्याच प्रयत्नात यशही मिळवलं.पहिल्यापासूनच एक रणनिती आखून आपण या परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय प्रदीपनं घेतला होता. याप्रकारे त्यानं आपल्या परीक्षेची तयारी सुरू केली. दीड वर्षांच्या अथक मेहनतीनंतर त्यानं आपली पहिली परीक्षा दिली आणि त्याच परीक्षेत त्याला यशही मिळालं. त्याच्या रँकनुसार त्याची निवड आयआरएस सेवेसाठी करण्यात आली. परंतु त्याच्या मनात आयएएसचं स्वप्न होतं. म्हणून त्यानं दुसऱ्यांदा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यातही त्याला यश मिळालं.उमेदवारांना सल्लाप्रदीपनं नॉलेज ट्रॅकला दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी उलगडा केला आहे. त्यानं युपीएससी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाचा सल्लाही दिला आहे. युपीएससीमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला धैर्यानं सतत मेहनत करावी लागेल. या परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला एक रणनिती तयार करणं आवश्यक आहे आणि त्याचीच अंमलबजावणी करून तुम्ही यश मिळवू शकता. अनेकदा आपल्याला यात अपयशही येतं. परंतु त्यातून निराश होण्याची गरज नाही. कठोर मेहनत ही तुम्हाला एक दिवस यश मिळवूनच देईल, असा सल्लाही त्यानं दिला आहे. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगdelhiदिल्लीIndiaभारतInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी