सॉफ्टवेअरमधला धोनी! रांचीच्या युवकाला Amazon नं दिलं तब्बल दीड कोटींचं पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:44 PM2022-01-21T18:44:09+5:302022-01-21T18:45:02+5:30

जागतिक स्तरावर झालेल्या गुगल समर ऑफ कोड GSOC 2021 मध्ये त्याची निवड झाली आहे.

Amazon gave a package of Rs 1.5 crore to the youth of Ranchi Shubham Raj | सॉफ्टवेअरमधला धोनी! रांचीच्या युवकाला Amazon नं दिलं तब्बल दीड कोटींचं पॅकेज

सॉफ्टवेअरमधला धोनी! रांचीच्या युवकाला Amazon नं दिलं तब्बल दीड कोटींचं पॅकेज

Next

रांची – झारखंडच्या रांचीसारख्या छोट्या शहरातून निघालेले टॅलेंट जगातील विविध क्षेत्रात नाव कमवत आहे. रांचीतून आलेल्या महेंद्र सिंह धोनीनं अवघ्या क्रिकेट विश्वात आपल्या नावाचा ठसा उमटवला. आज धोनीचं नाव घेतल्याशिवाय भारतीय क्रिकेटचा इतिहास लिहू शकणार नाही. आता रांचीतल्या एका युवकानं असेच यशाचं शिखर गाठलं आहे. शुभम राजला Amazon Berlin येथे सॉफ्टवेअर डेवल्पमेंट इंजिनिअर म्हणून ऑफर मिळाली आहे. कोडिंग आणि अल्गोरिथिममध्ये कौशल्य असलेल्या शुभमचं कर्तृत्व गुगलनंही मान्य केले आहे.

जागतिक स्तरावर झालेल्या गुगल समर ऑफ कोड GSOC 2021 मध्ये त्याची निवड झाली आहे. त्याला Amazon नं तब्बल दीड कोटींचे पॅकेज ऑफर केले आहे. शुभमला मिळालेलं हे यश पाहून कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरला नाही. शुभमचे शेजारीही भलतेच खुश आहे. सॉफ्टवेअरमधला धोनी आमच्या शेजारी राहतो हे सांगताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक अभिमान आहे.

रांचीच्या अरगोडा येथे राहणाऱ्या मदन सिंह आणि रिना सिंह यांच्या घरी जल्लोषाचं वातावरण आहे. शुभमला मिळालेली नोकरीची ऑफर ऐकून अनेकजण त्याचे कौतुक करण्यासाठी येत आहेत. सिंह जोडप्याचा मुलगा शुभमला दीड कोटींच्या पॅकेजची ऑफर झाली आहे. अमेझॉनच्या बर्लिन ओफिसमध्ये तो सॉफ्टवेअर डेवल्पमेंट इंजिनिअर म्हणून काम करेल. गुगलच्या जागतिक स्पर्धेत निवड झाल्यामुळे शुभमला त्याच्या करिअरमध्ये ही ऑफर मिळाली आहे.

शुभमने JVM Shyamali रांची येथून १२ वीचं शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या तो IIT आग्रटलामध्ये फायनल परीक्षा दिल्यानंतर अमेझॉन कंपनीत नोकरी करणार आहे. शुभमने ११ वीपासूनच कोडिंग करण्याचा अभ्यास सुरु केला होता. मुलाच्या या यशानं आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आहेत. आयुष्यात याहून मोठा आनंद नाही. मुलाच्या यशाचं कौतुक सगळीकडून होत आहे. शेजारीही मिठाई वाटत आहेत असं आई म्हणाली. आतापर्यंत इतर राज्यातील मुलं सॉफ्टवेअरमध्ये माहीर होते परंतु पहिल्यांदाच झारखंडचा युवक सॉफ्टवेअरमधला धोनी बनल्याचं शेजारी म्हणत आहेत. शुभमचं हे यश पाहता त्याच्याकडून शहरातील इतर मुलांनाही प्रेरणा मिळणार आहे.

Web Title: Amazon gave a package of Rs 1.5 crore to the youth of Ranchi Shubham Raj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app