शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Women's Hockey World Cup : भारतीय महिला संघाने हरूनही जिंकली मनं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 16:13 IST

मुंबई - महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत 44 वर्षांनंतर भारतीय महिला संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची स्वप्न थोडक्यात हुकले. कडव्या संघर्षानंतरही भारतीय संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये आयर्लंडकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीयांचे आव्हान संपुष्टात आले. त्याचबरोबर 2022च्या टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत थेट प्रवेश मिळवण्याची संधीही गमावली. पण, स्पर्धेतील एकंदर कामगिरीवर ...

मुंबई - महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत 44 वर्षांनंतर भारतीय महिला संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची स्वप्न थोडक्यात हुकले. कडव्या संघर्षानंतरही भारतीय संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये आयर्लंडकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीयांचे आव्हान संपुष्टात आले. त्याचबरोबर 2022च्या टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत थेट प्रवेश मिळवण्याची संधीही गमावली. पण, स्पर्धेतील एकंदर कामगिरीवर क्रीडा जगतातील दिग्गजांनी समाधान व्यक्त केले आहे. 

भारतीय महिलांनी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत संपूर्ण 60 मिनिटे आयर्लंडच्या आक्रमणपटूंना रोखले. आयर्लंडचे खेळाडू सातत्याने पेनल्टी क्षेत्रावर आक्रमण करत असताना भारतीय बचावपटूंनी त्यांना यश मिळू दिले नाही. गोलरक्षक सविता पुनियाला याचे अधिक श्रेय द्यायला हवे. पेनल्टी शूटआऊटमध्येही तीने आयर्लंडचे प्रयत्न रोखले, परंतु निर्णायक क्षणी तिला अपयश आले. 

2010 नंतर प्रथमच भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत खेळला आणि त्यातही समाधानकारक कामगिरी केली. भारतीय पुरूष हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्कीने महिला खेळाडूंचे कौतुक करताना म्हटले की, भारताच्या मुलींनी अखेरपर्यंत कडवी झुंज दिली. त्यांनी त्यांच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले. हेच महत्त्वाचे आहे. संघाने सर्वोत्तम खेळ केला, परंतु आजचा दिवस आयर्लंडचा होता. त्यामुळे हताश होऊ नका, पुढील स्पर्धांसाठी आणखी जिद्दीने खेळ करा.

माजी ऑलिम्पिक धावपटू पी. टी. उषा यांनीही भारतीय खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्या म्हणाल्या, तुम्हा मुलींचे अभिनंदन. निकाल जरी आपल्याला हवा तसा लागला नसला तरी तुम्ही दाखवलेल्या संघर्षाला सलाम. 

केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही कौतुक करणारे ट्विट केले. 

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतSportsक्रीडा