शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

भारतीय महिला हॉकी संघाने जिंकला आशिया चषक, रोमहर्षक लढतीत चीनवर केली मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 17:37 IST

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत चीनवर शूटआऊटमध्ये 5-4 अशी मात करत भारतीय महिला हॉकी संघाने आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

काकामिगहरा (जपान) - अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत चीनवर शूटआऊटमध्ये 5-4 अशी मात करत भारतीय महिला हॉकी संघाने आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. निर्धारीत वेळेत लढत 1-1 अशा बरोबरीत राहिल्यानंतर शूटआउटमध्ये जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत भारतीय महिलांनी विजयश्री खेचून आणली.  भारतीय महिला संघाचे आशिया चषक स्पर्धेतील हे दुसरे विजेतेपद आहे. या विजेतेपदाबरोबरच या स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघ 2018 साली होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. 

चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. 25 व्या मिनिटाला नवज्योत कौर हिने केलेल्या गोलच्या जोरावर भारतीय संघाने सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. ही आघाडी भारतीय महिलांनी 47 व्या मिनटापर्यंत टिकवली. पण 47 व्या मिनिटाला टियांटन लुका हिने गोल करत चीनला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर निर्धारीत वेळेत बरोबरी कायम राहिल्याने सामन्याचा निकाल शूटआऊटद्वारे लावण्यात आला. शूटआऊटमध्ये भारतीय संघाने 5-4 अशी बाजी मारली.

भारताने साखळी फेरीत सर्वच सामन्यात विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तान आणि उपांत्यफेरीत गतविजेत्या जपानला पराभूत केले. भारतीय संघाने साखळी फेरीत सिंगापूरला १०-०, चीनला ४-१, मलेशियाला २-० असे पराभूत केले होते.भारतीय संघ याआधी २००९ मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला होता. मात्र त्या वेळी चीनने भारताला ५-३ असे पराभूत केले होते. गेल्या वेळी २०१३ मध्ये क्वालालंपूरमध्ये झालेल्या स्पर्धेत भारत तिस-या स्थानी होता. भारताने आतापर्यंत २००४ मध्ये एकदाच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. 

 

टॅग्स :HockeyहॉकीSportsक्रीडाIndiaभारतchinaचीन