शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

भारतीय महिला एफआयएच सिरीज फायनल्सच्या उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 2:15 AM

भारतीय महिला हॉकी संघाची फिजीवर ११-० अशी एकतर्फी मात

हिरोशिमा : गुरजीत कौरने हॅट्ट्रिकसह नोंदविलेल्या चार गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने फिजीवर ११-० ने एकतर्फी मात करीत एफआयएच महिला हॉकी सिरीज फायनल्सची उपांत्य फेरी गाठली.गुरजीतने १५, १९, २१ आणि २२ व्या मिनिटाला प्रतिस्पर्धी गोलजाळीत धडक दिली. मोनिकाने ११ आणि ३३ व्या मिनिटाला दोन गोल केले. याशिवाय लालरेम्सियानीने चौथ्या, राणी रामपाल १० व्या, वंदना कटारियाने १२ व्या, लिलमा मिंझ ५१ व्या व नवनीत कौर हिने ५७ व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या भारताने सुरुवातीपासून सामन्यावर पकड निर्माण केली होती. संपूर्ण ६० मिनिटात फिजी संघाला एकदाही भारतीय गोलफळीवर हल्ला करता आला नाही.पहिल्या क्वार्टरमध्ये चौथ्या मिनिटाला लालरेम्सियानी हिने खाते उघडल्यानंतर कर्णधार राणीने दहाव्या मिनिटाला दुसरा गोल केला. पुढच्या मिनिटाला मोनिकाने नेहा गोयल हिच्या पासवर गोल नोंदवून आघाडी तिप्पट केली. आक्रमक फळीतील वंदना कटारियाने १२ व्या मिनिटाला गोल नोंदविला. यानंतर गुरजीत कौर ‘शो’ पहायला मिळाला. तिने चारही गोल १५ ते २२ अशा सात मिनिटांच्या खेळात नोंदविले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये मोनिकाने ३३ व्या मिनिटाला नववा गोल नोंदविला. लिलमा आणि नवनीत यांनीही गोल आघाडीत भर घातली. भारताला शनिवारी उपांत्य सामना खेळायचा आहे. (वृत्तसंस्था)आता लक्ष्य उपांत्यसामना जिंकण्याचे असेल. शानदार खेळ करीत बाद फेरी गाठणे उत्साहजनक आहे. कामगिरीतील सातत्याच्या बळावर आम्ही गटात अव्वल स्थान गाठले. उपांत्य सामना कुणाविरुद्ध होईल याला महत्त्व नाही, आम्ही केवळ आपल्या खेळावर लक्ष देणार आहोत. सर्वोत्कृष्ट कामगिरीसह स्पर्धा जिंकायची आहे.- राणी रामपाल, कर्णधार