शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

भारतीय पुरुष, महिला हॉकी संघ रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 4:28 AM

टोकियो येथे १७ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या आॅलिम्पिक टेस्ट स्पर्धेसाठी भारताचा पुरुष आणि महिला हॉकी संघ रवाना झाला आहे.

बंगळुरू : टोकियो येथे १७ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या आॅलिम्पिक टेस्ट स्पर्धेसाठी भारताचा पुरुष आणि महिला हॉकी संघ रवाना झाला आहे.भारताच्या पुरुष आणि महिला संघांना याच वर्षी आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेतही सहभागी व्हायचे आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाºया क्वालिफायरआधी दोन्ही संघांना आॅलिम्पिक टेस्ट स्पर्धेत चांगला अनुभव मिळण्याची आशा आहे. भारताचा पुरुष संघ यजमान जपान, न्यूझीलंड आणि मलेशियाविरुद्ध खेळेल तर महिला संघाला आॅस्ट्रेलिया, चीन आणि जपानचा सामना करावा लागेल. ही स्पर्धा युवा खेळाडूंना त्यांचा ठसा उमटवण्यासाठी चांगली संधी असेल. त्याचप्रमाणे टोकियोत आॅलिम्पिक होणार असल्यामुळे तेथील परिस्थिती समजण्याची संधी मिळणार असल्याचे भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीतसिंग म्हणाला. डिफेंडर ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत म्हणाला, ‘‘आम्ही आॅलिम्पिक क्लालिफिकेशन विषयी सकारात्मक आहोत. या ठिकाणी खेळल्याने आम्हाला तेथील परिस्थिती समजण्यास मदत होईल आणि आम्ही स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहोत.’’ महिला संघाची कर्णधार राणी म्हणाली, ‘‘गेल्या एका वर्षात आम्ही जपान आणि चीनविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे; परंतु एक संघ आहे की, ज्याच्याविरुद्ध आम्ही चांगली कामगिरी करू इच्छितो तो संघ आॅस्ट्रेलिया आहे.’’

टॅग्स :Hockeyहॉकी