शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

भारतीय पुरुष हॉकी संघाची दमदार सलामी, आशियाई विजेत्या जपानला नमवले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 5:21 PM

भारतीय पुरुष हॉकी संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीचा इतिहास मागे सोडून नव्या दमाने सुरुवात केली आहे.

इपोह : भारतीय पुरुष हॉकी संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीचा इतिहास मागे सोडून नव्या दमाने सुरुवात केली आहे. त्यांन सुलतान अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आशिआई स्पर्धेतील विजेत्या जपानवर 2-0 असा विजय मिळवला. वरुण कुमारने 24व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना भारताला आघाडी मिळवून दिली आणि त्यात सिमरनजीत सिंगने ( 55 मि.) मैदानी गोल करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताला पुढील साखळी सामन्यात कोरियाचा सामना करावा लागणार आहे, त्यानंतर मलेशिया ( 26 मार्च), कॅनडा ( 27 मार्च) आणि पोलंड ( 29 मार्च) यांच्याशी भारतीय संघ भिडेल. गटातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत खेळतील.  

पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरीनंतर भारतीय खेळाडूंनी सामन्यावर पकड निर्माण करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या सत्राच्या आठव्या मिनिटाला भारताने पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवला आणि वरुणने त्यावर गोल केला. कर्णधार मनप्रीत सिंग आणि कोठाजीत सिंग यांनी जपानच्या बचावफळीला चांगलेच झुंजवले. त्यांनी गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या, परंतु आघाडीच्या फळीला अपयश आले. दुसरे सत्र संपायला सेकंदाचा कालावधी असताना मनदीप सिंगने सुमीत कुमार ( ज्युनियर)च्या सुरेख पासवर गोल करण्याची संधी गमावली. तिसऱ्या सत्रात जपानने पहिला पेनल्टी कॉर्नर कमावला, परंतु पी आर श्रीजेशची बचावभिंत त्यांना ओलांडता आली नाही. भारत आणि जपान यांनी गोल करण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले. या सत्राच्या अखेरच्या मिनिटात जपानच्या केनजी किटाझॅटोने बरोबरीची संधी गमावली. 

अखेरच्या सत्रात भारतीय खेळाडूंचेच वर्चस्व राहिले. वरुणला आणखी एक गोल करता आला असता, परंतु तो यावेळी अपयशी ठरला. 55 व्या मिनिटाला जपानने गोलरक्षकाला हटवले आणि त्याचा फायदा भारताने उचलला. सिमरनजीत सिंगने गोल करत भारताची आघाडी 2-0 अशी मजबूत केली. अखेरच्या मिनिटाला जपानला पेनल्टी कॉर्नर मिळाला. श्रीजेशच्या जागी बदली म्हणून आलेल्या कृष्णा पाठकने जपानचा प्रयत्न हाणून पाडला आणि जपानची पाटी गोलशून्यच ठेवली.  

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत