शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
2
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
3
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
4
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
5
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
6
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
7
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
8
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
9
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
10
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
11
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
12
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
14
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
15
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
16
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
17
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
18
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
19
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
20
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात

भारताने बेल्जियमला २-२ ने बरोबरीत रोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 3:41 AM

यजमान भारताने रविवारी पुरुष हॉकी विश्वचषकात पूल सीच्या लढतीत शानदार खेळ करताना आॅलिम्पिक रौप्यपदकविजेत्या बेल्जियमला २-२ असे बरोबरीत रोखले.

भुवनेश्वर : यजमान भारताने रविवारी पुरुष हॉकी विश्वचषकात पूल सीच्या लढतीत शानदार खेळ करताना आॅलिम्पिक रौप्यपदकविजेत्या बेल्जियमला २-२ असे बरोबरीत रोखले.बेल्जियमच्या एलेनांडर हेंड्रिक्स याने आठव्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली होती. भारताने तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये हरमनप्रीत सिंह (३९ मिनिट) आणि सिमरनजित सिंह (४७ मिनिट) यांच्या गोलच्या जोरावर स्कोअर २-१ असा केला. मात्र अखेरच्या काही मिनिटांत यजमान संघाचा बचाव कमी पडला आणि दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत पोहोचले. बेल्जियमच्या सायमन गोगनार्डने ५६ व्या मिनिटाला गोल केला. या ड्रॉसोबतच जागतिक रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर असलेल्या भारताने गटात अव्वल स्थान मिळवले आहे. गोल अंतराच्या तुलनेत भारत बेल्जियमपेक्षा पुढे आहे. दोन्ही संघांनी आपल्या दोनपैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे.भारताने दक्षिण आफ्रिकेला ५-० ने पराभूत केले होते, तर बेल्जियमने कॅनडाला २-१ पराभूत केले. भारतीय संघाचा पुढचा सामना आठ डिसेंबरला कॅनडासोबत होईल, तर बेल्जियमचा संघ दक्षिण आफ्रिकेशी भिडेल.गेल्या सामन्याच्या तुलनेत भारतीय संघ बेल्जियमविरोधात सुरुवातीच्या दोन क्वार्टरमध्ये विखुरलेला होता. यजमान संघाच्या मिडफिल्डमधील संयोजनात कमतरता दिसली. त्यामुळे त्यांना गोल करण्याच्या संधी निर्माण करता आल्या नाहीत. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये रेड लायन्सचा दबदबा दिसला. त्यांनी यजमान संघाच्या बचावफळीवर अनेक वेळा हल्ले केले.बेल्जियमला दुसºया मिनिटातच गोल करण्याची संधी मिळाली होती. त्यांना सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले मात्र भारतीय डिफेन्सला ते भेदू शकले नाहीत. आठव्या मिनिटाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला त्यावर हेंड्रिक्स याने पहिला गोल केला. हाफटाईमनंतर भारतीय संघाचा खेळ सुधारला. तिसºया क्वार्टरमध्ये भारताने वेगाने दबाव निर्माण केला आणि ३९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. आणि त्यावर हरमनप्रीत सिंह याने गोल करीत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली.चौथ्या क्वार्टरमध्ये सिमरनजित सिंह याने स्पर्धेतील आपला तिसरा गोल केला. कोथाजित सिंह याने उजव्या बाजूने दिलेल्या पासवर सिमरनजित सिंह याने शानदार गोल केला. त्यामुळे भारताने २-१ अशी आघाडी घेतली. सामना संपण्यास पाच मिनिटे शिल्लक असताना बेल्जियमने गोलकीपरला बाहेर पाठवत अतिरिक्त खेळाडू मैदानात पाठवला. त्याचे फळदेखील त्यांना मिळाले. गोगनार्डने गोल करत संघाला २-२ अशी बरोबरी साधून दिली. भारतीय संघाने अखेरच्या मिनिटात काही चांगल्या चाली रचल्या. मात्र बेल्जियमने गोलकीपर नसतानाही चांगला बचाव केला.>कॅनडा-दक्षिण आफ्रिका लढत ड्रॉकॅनडा आणि दक्षिण आफ्रिकेने रविवारी येथे झालेल्या पूल सीमध्ये आपल्या दुसºया सामन्यात १-१ असा ड्रॉ खेळत बाद फेरीत पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या. विश्वरँकिंगमध्ये ११ व्या स्थानावर असलेल्या कॅनडाने १५ वे रँकिंग असलेल्या दक्षिण आफ्रिकेला कडवी टक्कर दिली. एनकोबिले एनटुली याच्या शानदार रिव्हर्स स्टिकने केलेल्या गोलच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने सामन्यात ४३ व्या मिनिटाला आघाडी घेतली. मात्र संघ जास्त वेळ या गोलचा आनंद साजरा करू शकला नाही. दोन मिनिटांतच कॅनडाचा कर्णधार स्कॉट टप्पर याने पेनल्टी स्ट्रोकला गोलमध्ये बदलत स्कोअर १ -१ असा बरोबरीत आणला.