शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भारताने उडवला मलेशियाचा ५-० ने धुव्वा; गुणतालिकेत अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 05:56 IST

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : चीनने दक्षिण कोरियाला १-१ असे बरोबरीत रोखले

चेन्नई : यजमान भारताने पुन्हा एकदा दिमाखात विजयी मार्ग पकडताना आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत मलेशियाचा ५-० असा धुव्वा उडवला. त्याच वेळी रविवारी रंगलेल्या अन्य सामन्यात चीनने दक्षिण कोरियाला १-१ असे, तर जपानने पाकिस्तानला ३-३ असे बरोबरीत रोखले. 

या दिमाखदार विजयासह भारताने सर्वाधिक ७ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली असून मलेशिया ६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. यानंतर कोरिया आणि जपान अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहे. एकतर्फी रंगलेल्या सामन्यात भारताने जबरदस्त वर्चस्व राखताना मलेशियाला गोल करण्याची एकही संधी दिली नाही. मलेशियाने पहिले दोन सामने जिंकत स्पर्धेत धडाक्यात सुरुवात केली होती. मात्र, रविवारी त्यांना भारताविरुद्ध लयच सापडली नाही. 

भारतीयांनी सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना सहज वर्चस्व मिळवले. सेल्वम कार्थी (१५वे मिनिट) याने पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. यानंतर हार्दिक सिंग (वय ३२), हरमनप्रीत सिंग (४२), गुरजंत सिंग (५३) आणि जुगराज सिंग (५४) यांनी प्रत्येकी एक गोल करत मलेशियाचे कंबरडे मोडले. भारतीय संघ सोमवारी आपल्या पुढील सामन्यात दक्षिण कोरियाच्या आव्हानाला सामोरे जाईल. 

 चीन-दक्षिण कोरिया बरोबरी चीनने भक्कम बचावाचे शानदार प्रदर्शन करताना बलाढ्य दक्षिण कोरियाला १-१ असे बरोबरीत रोखले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये १८ व्या मिनिटाला कर्णधार जाँगह्युन जाँग याने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत दक्षिण कोरियाला आघाडीवर नेले. मध्यंतरापर्यंत कोरियन संघाने ही आघाडी कायम राखली. दुसऱ्या सत्रात मात्र चीनने मुसंडी मारली. ४३ व्या मिनिटाला चोंगकोंग चेनने अप्रतिम मैदानी गोल करत चीनला १-१ अशी बरोबरी साधून दिली. हीच बरोबरी अखेरपर्यंत कायम राहिली. 

दुसरीकडे, पाकिस्तान-जपान लढतही ३-३ अशी बरोबरीत सुटली. जपानकडून तनाका सरेन (१३ वे मिनिट), कातो रायोसेइ (३७) आणि ओहाशी मसाकी (४५) यांनी प्रत्येकी एक गोल केला. पाकिस्तानकडून राणा अब्दुलने नवव्या मिनिटाला गोल केल्यानंतर मुहम्मद खानने (२५ आणि ५५ मिनिटाला) दोन गोल केले.