शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Asian Games 2018 : चार हॅटट्रिक, 26 गोल, भारतीय हॉकी संघाने 86 वर्षांनंतर मिळवला असा धडाकेबाज विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 15:04 IST

गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाने यंदाही आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.

जकार्ता - गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाने यंदाही आपली विजयी घोडदौड कायम राखली असून, आज झालेल्या लढतीत भारतीय संघाने हाँगकाँगवर गोलची बरसात करत 26-0 अशा फरकाने धुव्वा उडवला.  भारतीय हॉकी संघाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या लढतीत भारतीय संघाकडून चार हॅटट्रिक नोंदवल्या गेल्या.

एकतर्फी झालेल्या या लढतीत भारतीय संघाने हाँगकाँगवर सुरुवातीपासून गोलचा वर्षाव गेला. या सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला आकाशदीप आणि मनप्रीतने गोल केले.  त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या मिनिटाला रुपिंदरपाल सिंहने गोल केले. पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस भारताकडे 6-0 अशी आघाडी होती. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीय संघाने सात गोल करून मध्यंतराला आपली आघाडी 13-0 अशी वाढवली. मध्यंतरानंतरच्या खेळावरही भारतीय संघाचेच वर्चस्व राहिले. तिसऱ्या क्वार्टरअखेर भारताने 18-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताने अजून 8 गोल करून आपली गोलसंख्या 26 वर पोहोचवली.  भारताकडून हरमनप्रीतने चार, आकाशदीप, रूपिंदर, ललित यांनी प्रत्येकी तीन तर सुनील आणि मनदीप यांनी प्रत्येकी दोन गोल केले. याशिवाय विवेक, अमित, वरुण, दिलप्रीत, चिंग्लेसाना, समरजीत आणि सुरिंदर यांनी प्रत्येकी एक गोल केला. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाHockeyहॉकी