शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

हॉकी विश्वचषक स्पर्धा: भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 1:42 AM

हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अखेरच्या सामन्यात भारताने क गटात शनिवारी कॅनडावर ५-१ ने मात कर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

भुवनेश्वर : हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अखेरच्या सामन्यात भारताने क गटात शनिवारी कॅनडावर ५-१ ने मात कर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या विजयासह भारताने गटात अव्वल स्थान कायम राखले. कॅनडाकडून एकमेव गोल फ्लोरिस वान सोन याने ३९ व्या मिनिटाला केला.मध्यंतरापर्यंत कॅनडाने भारताला चांगली लढत दिली. क गटात चांगली कामगिरी केलेल्या भारताला उपांत्यफेरी गाठण्यासाठी या सामन्यात विजय आवश्यकच होता. मात्र सुरुवातीची काही मिनिटे कॅनडाच्या बचावपटूंनी भारतीय आक्रमण चांगलेच थोपवून धरले होते. मनदीपसिंग, सिमरनजीत सिंग, आकाशदीप यांनी रचलेल्या चाली कॅनडाच्या बचावफळीने हाणून पाडल्या. सामन्याच्या १२ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रितने कॅनडाचा गोलरक्षक किंडलर याला चकवत गोल केला.दूसऱ्या सत्रातही कॅनडाच्या बचावपटूंनी चांगला खेळ केला. तिसºया सत्रात कॅनडाने आक्रमक धोरण स्विकारले. यामुळे भारतीय खेळाडूंचा खेळ विस्कळीत झाला. सामन्याच्या ३९ व्या मिनिटाला कॅनडाच्या व्हॅन सोन फ्लोरिसने गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. चौथ्या सत्रात अखेर भारतीय आघाडीच्या फळीतल्या खेळाडूंनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करण्यास सुरुवात केली. चिंगलेनसाना सिंहने ४६ व्या मिनिटाला, ललित उपाध्याय याने ४७ आणि ५७ व्या मिनिटाला, अमित रोहिदास याने ५१ व्या मिनिटाला गोल केला.या विजयासह भारत पूल सीमध्ये सात गुण घेत गोल फरकाच्या जोरावर अव्वल स्थानी आहे. बेल्जिअम दुसऱ्या स्थानावर आहे. तर कॅनडा तिसºया स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला.भारताने आघाडीवर राहत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. तर अंतिम आठमध्ये स्थान मिळवण्यासाठी बेल्जिअम आणि कॅनडाला क्रॉस ओव्हर लढत खेळावी लागेल. कॅनडा आणि दक्षिण आफ्रिका संघाकडे प्रत्येकी एक गुण होता. मात्र गोल फरकाच्या जोरावर कॅनडाने तिसरे स्थान मिळवले. भारत आपली उपांत्यपूर्व लढत १३ डिसेंबर रोजी खेळेल.

टॅग्स :Hockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धाIndiaभारतCanadaकॅनडा