शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
3
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
4
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
5
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
6
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
7
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
8
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
9
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
10
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
11
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
12
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
13
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
14
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
15
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
16
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
17
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
18
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
19
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
20
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण

Hockey World Cup 2018 : कॅनडाच्या जिगरबाज खेळाने आफ्रिकेच्या स्वप्नांना सुरुंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 18:46 IST

Hockey World Cup 2018: या निकालामुळे आफ्रिकेचे आव्हान जवळपास गटातच संपुष्टात आल्यात जमा आहे

ठळक मुद्देकॅनडा-आफ्रिका सामना 1-1 बरोबरीतC गटात कॅनडा तिसऱ्या स्थानावर दोन्ही संघांच्या खात्यात 1-1 गुण

भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा : बलाढ्य बेल्जियमला सलामीच्या सामन्यात झुंजवणाऱ्या कॅनेडाने 'C' गटातील दुसऱ्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले. पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेतील या निकालामुळे आफ्रिकेचे आव्हान जवळपास गटातच संपुष्टात आल्यात जमा आहे. कॅनेडाने मात्र उपांत्यपूर्व फेरीच्या आशा अजूनही पल्लवीत ठेवल्या आहेत.

पहिल्या सत्रात आफ्रिकेला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु कॅनडाच्या गोलीने त्यांना यश मिळवू दिले नाही. त्याने दोन अप्रतिम बचाव करताना आफ्रिकेचे आक्रमण थोपवले. पहिल्या सत्रात आफ्रिकेच्या खेळाडूंनी चेंडूवर अधिक ताबा राखला असला तरी त्यांना कॅनडाची बचावभींत भेदण्यात अपयश आले. दोन-तीन वेळा त्यांना गोलपोस्ट जवळ जाऊनही गोल करता आला नाही. दुसऱ्या सत्रात कॅनेडाकडून पलटवार झाला. त्यांनी आक्रमणाची धार तीव्र करताना आफ्रिकेच्या डी क्षेत्रात हल्ला चढवला. मात्र, आफ्रिकेच्या गोलरक्षकाने त्यांचे आक्रमण थोपवले. त्यामुळे मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीतच राहिला. आफ्रिकेचे खेळाडू गोल करण्याच्या संधी तर निर्माण करत होते, परंतु त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात ते अपयशी ठरले. आफ्रिकेच्या खेळाडूंनी निर्माण केलेल्या संधीचा विचार केल्यास, त्यांचे 4-5 गोल सहज झाले असते, पण त्यांचे दुर्दैव. पण, 43 व्या मिनिटाला बिली एलतुलीने आफ्रिकेला मैदानी गोल करून दिला. त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. स्कॉट टुपरने 45 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोक्सवर गोल करताना कॅनडाला बरोबरी मिळवून दिली.  शेवटची पंधरा मिनिटे दोन्ही संघांचा कस पाहणार होता. आफ्रिकेला सहा पेनल्टी कॉर्नर मिळाले, त्याउलट कॅनेडाला तीन, परंतु दोघांनाही गोल करता आला नाही. दोन्ही संघाचे गोलरक्षक खूपच सतर्क होते. अखेरच्या पाच मिनिटांत कॅनडाला मिळालेला कॉर्नर आफ्रिकेचा गोली जोन्स याने अचुकपणे अडवला. अखेरच्या अडीच मिनिटात आफ्रिकेला कॉर्नरची संधी मिळाली, परंतु त्यातून काहीच निकाल लागला नाही. अखेरच्या दीड मिनिटांत आफ्रिकेचा गोलरक्षक खेळाडूच्या भूमिकेत आला. आफ्रिकेने संपूर्ण अकरा खेळाडू आक्रमणात उतरवले, परंतु त्यांना 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.  

टॅग्स :Hockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धाCanadaकॅनडाSouth Africaद. आफ्रिका