भुवनेश्वर : दोन वेळच्या जागतिक विजेत्या जर्मनीने आक्रमक खेळ करत विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या ‘ड’ गटात नेदरलँड्सला ४-१ असे लोळवले. जर्मनीकडून मॅथिअस मुलर (३०वे मिनिट), लुकास विंडफडर (५२वे), मार्को मिल्टकाऊ (५४वे) आणि ख्रिस्तोफर रुहर (५८वे) यांनी गोल केले. नेदरलँड्सकडून एकमेव गोल वेलेंटाईन वर्गा याने १३व्या मिनिटाला केला. अन्य सामन्यात मलेशियाने पाकिस्तानला १-१ असे बरोबरीत रोखले. (वृत्तसंस्था)
जर्मनीचा दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 04:04 IST